Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: प्रशासकीय कार्यालयात न बसता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कामाचा दर्जेदारपणा तपासणे आणि मंडईतील व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर बसून त्यांच्या समस्या जाणून घेणे, या त्यांच्या कार्यपद्धतीचे वाईकरांकडून कौतुक होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 11, 2026 | 08:56 PM
Wai News, Anil Sawant, Wai Municipal Council, Satara News,

Wai News, Anil Sawant, Wai Municipal Council, Satara News,

Follow Us
Follow Us:

Satara News: वाई नगरपरिषदेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांना वेग आला असून, या कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. केवळ कार्यालयात बसून विकासकामांचा आढावा न घेता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन त्यातील बारकावे तपासण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. Wai Municipal News: President Anil Sawant Inspects Development Works Directly on Ground

मंडई परिसरात सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष सावंत यांनी रस्त्या च्या कामात बांधकामामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या प्रमाणात अथवा गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, याबाबत संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या. “विकासकामे ही जनतेच्या पैशातून होत असल्याने ती मजबूत, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी असली पाहिजेत,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

मंडईमध्ये वाई शहरासह तालुक्यातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी मंडईत फिरताना अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी मंडई परिसरातील बैठक व वाहतूक व्यवस्था अशा पद्धतीने करण्यात येत आहे की, एखादे वाहन अवघ्या दोन मिनिटांत परिसरातून सहजपणे बाहेर पडावे. याचीही नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

मात्र या पाहणीदरम्यान घडलेला एक प्रसंग अनेकांच्या मनाला भावून गेला. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी मंडईतील व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर जाऊन चक्क व्यापाऱ्यांसोबत बसत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. सत्तेच्या खुर्चीवर बसलेला पदाधिकारी व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर येऊन आपल्यासोबत बसतो, आपली विचारपूस करतो आणि आपल्या अडचणी मनापासून ऐकून घेतो, हा अनुभव व्यापाऱ्यांसाठी भावनिक ठरला.

“आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमच्या कट्ट्यावर, आमच्या हातगाडीवर येऊन बसणारा हा पहिलाच नगराध्यक्ष असावा,” अशा भावना काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना केवळ त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या नाहीत, तर ग्राहकांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल, ग्राहकांशी आपुलकीने कसे वागता येईल आणि मंडई परिसर अधिक शिस्तबद्ध व सुंदर कसा ठेवता येईल, याबाबतही मार्गदर्शन केले.

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO

नगराध्यक्ष आणि व्यापारी यांच्यातील हा संवाद म्हणजे केवळ पाहणी नव्हती, तर प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यातील जिव्हाळ्याचा सेतू होता. पदाचा कोणताही बडेजाव न करता व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर बसून त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करणाऱ्या नगराध्यक्षांच्या या कृतीमुळे मंडई परिसरातील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

“आमच्यासाठी काम करणारा नगराध्यक्ष आमच्यात येऊन बसतो, आमचे ऐकून घेतो, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे,” अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या या अनोख्या संवादाचे मंडई परिसरातील व्यापाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

या पाहणीप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय ढेकाने, नगरसेवक अजित शिंदे, प्रवीण जाधव-भुसारी, निखिल जाधव-भुसारी, निलेश मोरे, संतोष जमदाडे आदी उपस्थित होते.

विकासकामांचा दर्जा तपासताना कठोरता आणि सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकताना आपुलकी या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या आजच्या मंडई पाहणीदरम्यान पाहायला मिळाला. त्यामुळे ‘नगराध्यक्ष म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा माणूस’ अशी भावना व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 

Web Title: Wai municipal president anil sawant inspects mandai development works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध
1

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
2

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर
3

Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर
4

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.