Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहा तास रांगेत प्रतीक्षा केली मात्र दर्शनावेळी धक्काबुक्की झाली; पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धक्कादायक प्रकार

अनेकवेळा याबाबत आवाजही उठवण्यात आला आहे. मात्र, तक्रारदार व्यक्तीलाच उलट प्रश्न करत प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नक्की कुणाच्या दबावाखाली प्रशासन काम करते, असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 20, 2024 | 02:44 PM
सहा तास रांगेत प्रतीक्षा दर्शनावेळी मात्र धक्काबुक्की*

सहा तास रांगेत प्रतीक्षा दर्शनावेळी मात्र धक्काबुक्की*

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांना सहा ते सात तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. मात्र, एवढ्या वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही विठुरायाच्या ऐन दर्शनावेळी विठुरायाजवळ उभे असणाऱ्या खासगी महिला सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांना अरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केली जात आहे. यासोबतच विठुरायाच्या पायाला साधा स्पर्शही करू न देता अगदी एक-दोन सेकंद दर्शनही घेऊ दिले जात नसल्याने संपूर्ण राज्यभरातील भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेदेखील वाचा : ‘सांगलीत काँग्रेससोबत आघाडी नको, विश्वासघात होईल’; ठाकरे गटाच्या ‘या’ पदाधिकाऱ्याची भूमिका

सध्या सलग सुट्ट्यांमुळे तसेच श्रावण महिन्यामुळे पंढरीतील भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच काल नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणानिमित्त महिला भाविक हजारोंच्या संख्येने पंढरीत दाखल झाल्या होत्या. मात्र, सात तास ताटकळत रांगेत प्रतीक्षा करूनही ऐन दर्शनाच्या वेळी मात्र गाभाऱ्यातील सुरक्षारक्षक महिला कर्मचाऱ्याकडून महिला भाविकांना अरेरावीची भाषा करत दर्शन न करू देताच ओढून ढकलून दिले जात होते. त्यामुळे महिला व भाविकांकडून मंदिर प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

या अगोदरही अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. वयोवृद्ध व वयाने ज्येष्ठ असणाऱ्या भाविक भक्तांसोबतही सुरक्षा रक्षकांकडून केली जाणारी ही भाषा व धक्काबुक्की अशोभनीय असली तरी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाही अद्यापपर्यंत होत नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

तक्रारीसाठी सदर ठिकाणी मंदिर समितीचे व्यवस्थापक सहसा उपस्थित नसतात. याचबरोबर त्यांच्याशी संपर्क केला असता फोनवरही बोलण्यास ते टाळाटाळ करत असल्याने भाविकांनी नक्की कुणाकडे दाद मागावी, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अनेकवेळा उठवण्यात आला आवाज

अनेकवेळा याबाबत आवाजही उठवण्यात आला आहे. मात्र, तक्रारदार व्यक्तीलाच उलट प्रश्न करत प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नक्की कुणाच्या दबावाखाली प्रशासन काम करते, असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.

सशुल्क दर्शनाचा मुद्दा ऐरणीवर

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी खाजगी व्यक्तींमार्फत पैसे घेऊन सशुल्क दर्शन करून दिले जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. दोन दिवसांपूर्वी असाच एक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Waited in the queue for six hours but was beaten at the time of darshan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 02:44 PM

Topics:  

  • Temple Darshan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.