वालचंदनगर- जंक्शन या रस्त्यासाठी २२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, काही वर्षातच या रस्त्यावर असंख्य ठिकाणी खड्डे पडल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. या मुख्य रस्त्यावरून वालचंदनगर, कळंब येथील विद्यालय व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी हजारोच्या संख्येने विद्यार्थी दररोज ये- जा करीत असतात. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने या विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.