
Santosh Deshmukh murder accused walmik Karad given VIP treatment in Beed Jail
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खंडणी प्रकरणाशी संबध असल्याचा ठपका ठेवत वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण आता सीआयडीकडे सोपवण्यात आलं असून वाल्मिक कराडची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. आता या चौकशीसंबंधातील नवी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील एका भाजपच्या माजी नगरसेवकाची चौकशी सीआयडीने केल्याची माहिती आहे.
Maharashtra Politics: राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा मोठा भूकंप; नव्या राजकीय समीकरणांचा ‘उदय’
वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला संशय आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस कराडशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात सीआयडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची आज सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.
पुण्यात वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. या या खरेदीमध्ये खाडेंनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सीआयडीला आहे. या संशय असल्याच्या पार्श्वभूमीवरती दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे. काही वेळापूर्वीच ही चौकशी संपली असून खाडे पुण्याला यायला निघालेत. वाल्मिक कराडचे पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या रहात असलेल्या इमारतीत दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफीस स्पेसेस खरेदी केलीत. खाडेंच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाल्याचा संशय आहे. दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडेंपासून वाल्मिक कराडला ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता. म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलावलं होतं. माझी चौकशी झाली, मी जी काही उत्तर द्यायची आहेत, ती दिली आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा माझी कराडशी तोंड ओळख आहे.वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही. माझी चौकशी झाली, मी सीआयडीला सहकार्य केलं आहे, असं खाडे म्हणाले आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची जामीन मिळावा म्हणून धडपड सुरू आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर केजच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र कराडच्या वकीलांनी मागणी केल्यानंतर आता या अर्जावर २३ जानेवारीला सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराड याची सध्या चौकशी सुरू असून तो कोठडीत आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कराडने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यामुळे केजच्या सत्र न्यायालयाकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सीआयडीने त्याच्या या जामीन अर्जावर आक्षेप घेतला असून या प्रकरणाच्या अधिकच्या चौकशीसाठी त्याला कोठडीत ठेवण्याची मागणी केली आहे. त्याच्यावर या प्रकरणी मकोका देखील लावण्यात आलेला आहे. दरम्यान, या अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती वाल्मिक कराडच्या वकीलांनी केली होती. त्यामुळे आता ही विनंती मान्य करून न्यायालयाने याबद्दलची सुनावणी २३ जानेवारीला ठेवली आहे.