उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर संजय राऊतांची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले "त्यांनी दरे गावी जाण्यापेक्षा..."
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. या नाराजीच्या चर्चांमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे गावी निघून गेले आहेत. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी देखील ते आपल्या गावी गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी जाण्यापेत्रा प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात जाऊन बसावं, असा टोला लगावला आहे.
”ठाण्याच्या उपमुख्य्मंत्र्यांना राग येतो आणि ते सारखं दरे गावात जाऊन बसतात. महाराष्ट्र आता यांच्या रुसव्या फुगव्यांवर चालणार आहे का? सत्तेचा वापर यांनी राज्याच्या हितासाठी करायला हवा. पण यांचे रुसवे फुगवे सुरू आहेत. हे लोक अजूनही विजयाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत, एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहेत. त्यांनी कुंभमेळ्यात जाऊन नागा साधू व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या अस्वस्थ आत्म्यांसाठी योगी आदित्यनाथ यांनी तंबू तयार केले आहेत. त्यांनी तिथे जावं. तिथे आयआयटीबाबा देखील आहे. आणखी एक दरे गावच्या बाबाने जाऊन बसावं”, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
उदय सामंत यांच्याकडे २० आमदार असून शिवसेना फोडल्यानंतर भाजप आता शिंदे गट फोडायच्या तयारीत आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच पक्षांची फोडाफोटी करणं हे भाजपाचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
Akshay Shinde News Update; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंऐवजी उदय सामंत यांना घेऊन दावोसला गेले आहेत. उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. विधानसभा निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे रुसले, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि हे प्रकरण शांत झालं. भाजपाने आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, आता शिंदे गट आणि अजित पवार गट फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पक्ष फोडाफोटी करणं हेच भाजपाचं राजकारण आहे, वापरा आणि फेकून द्या, ही भाजपाची रणनीती आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून त्यांनी महायुती सरकारलाही लक्ष्य केलं. पालकमंत्री पद न मिळाल्याने एका मंत्र्यााने रायगडमध्ये रस्ता रोको केला आहे. इतकं प्रचंड बहुमत मिळालं तरी त्याचा अनादर सुरु आहे. भाजपाकडे बहुमत आहे. इतकं बहुमत असताना पालकमंत्री दिला जातो आणि परत घेतला जातो.इतक्या भयंकर पद्धतीने काम सुरु आहे. आता फक्त मारहाण होणं बाकी आहे”, असे ते म्हणाले.