Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 08:20 AM
राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात 'यलो अलर्ट'ही जारी

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात 'यलो अलर्ट'ही जारी

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दुपारी कडक उन्ह तर रात्री हवेत गारवा दिसून येत आहे. असे असताना आता हवामान विभागाने ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ विभागात विजांसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार, आता या भागांत ‘यलो अलर्ट’ही जारी केला गेला आहे.

परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पिकांचे देखील नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. काही भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दिवसा तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर रात्री तापमानात काहीशी घट होईल.

मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार

मराठवाड्यातही वातावरणात बदल दिसून येऊ शकतो. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यात तापमानातही काही बदल दिसून येणार आहे. त्यानुसार, कमाल तापमान 33 ते 35°C दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 20 ते 22°C च्या आसपास राहील. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत दुपारचे तापमान किंचित कमी जाणवू शकते.

चंद्रपूर, गडचिरोलीत पावसाचा इशारा

विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते आणि काही भागांत विजांच्या कडकडाटासह सरी पडण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…

Web Title: Warning of rain with thunder and lightning in many parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Rain Alert

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या
2

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
3

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! ‘या’ १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी
4

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! ‘या’ १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.