Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: जिल्ह्यात परदेशी पाहुण्या पक्ष्यांची हजेरी वाढू लागली! हिवाळी पाहुणे महाराष्ट्रात दाखल

जिल्ह्यात हलक्या थंडीची चाहूल लागताच युरोप, सायबेरिया आदी देशांतून स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून विविध तलावांवर त्यांच्या हजेरीत हळूहळू वाढ दिसत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 08:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सध्या काही जलाशयांवर स्थलांतरीत पक्ष्यांची हजेरी
  • विविधता जिल्ह्यातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची
  • काही आठवड्यांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता
राज्यात हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरू होते. युरोप, सायबेरिया, दक्षिण आफ्रिका अशा दूरवरच्या देशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करीत हे हिवाळी पाहुणे महाराष्ट्रात दाखल होतात. जिल्ह्यातही यंदा स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सुरुवात काहीशी मंद आणि उशिरा झाल्याचे पक्षीप्रेमी व अभ्यासकांचे निरीक्षण आहे. सध्या काही जलाशयांवर स्थलांतरीत पक्ष्यांची हजेरी दिसू लागली असून थंडीचा कडाका वाढताच त्यांच्या संख्येत मोठी भर पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नाडी थांबलेली, हात तुटलेला… पण MBBS विद्यार्थ्याच्या तत्परतेने दुचाकीस्वाराचा जीव…

हवामान विभागानुसार अपेक्षित थंडी अद्याप पडलेली नसल्याने स्थलांतरणाची गती मंदावली. उत्तरेकडील देशांमध्ये थंडीचा कडाका वाढताच हे पक्षी सुरक्षित आणि अन्नसंपन्न ठिकाणांच्या शोधात दक्षिणेकडे झेपावतात. आता तापमानात घट सुरू झाल्याने हळूहळू पक्ष्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी विविध तलावांवर पक्ष्यांचा कलरव ऐकू येऊ लागला असून निसर्गप्रेमींना हा आनंददायी बदल जाणवत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कापशी, काटेपुर्णा, दगडपारवा, सिसा-मासा, मच्छी तलाव, आखतवाडा, कुंभारी, दुधाळा, घुसर, पोपटखेड, शिवणी, सुकळी आणि जिल्ह्यातील इतर अनेक लहान-मोठ्या जलाशयांवर या परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. या तलावांवर सकाळी पक्षी निरीक्षणासाठी मोठी गर्दी होताना दिसते. अभ्यासक, छायाचित्रकार, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी यांना या काळात पक्षी निरीक्षणाचा मनसोक्त आनंद मिळतो.

अकोल्यातील पक्षी अभ्यासक देवेंद्र तेलकर यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जलाशयांवर सध्या स्पॉटबिल डक, ब्राम्हणी डक, कॉम्बडक, लेसर विसलिंग डक, पिनटेल डक, कॉमन टील, गार्गेनी, नॉर्दर्न पोचार्ड, कॉमन पोचार्ड, पेन्टेड स्टॉर्क, ओपनबिल स्टॉर्क, स्यूनबील यांसारख्या परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे दर्शन होत आहे. त्यांच्या संख्येत आगामी काही आठवड्यांत वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच, स्थानिक पक्ष्यांमध्ये कॉमन बी-ईटर, ब्लू-टेल बी-ईटर, बुलीनेक स्टॉर्क, पेंटेड स्नाइप, कॉमन स्नाइप, ब्लॅकविंग टील्ट, सॅण्डपायपर, वुड सॅण्डपायपर, रेडशँक, रफ, ब्लॅक आयबिस, ग्लॉसी आयबिस, रिंग प्लोव्हर, रिव्हर टर्न आदी विविध प्रजातींचे दर्शनही घडत आहे. स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांमधील ही विविधता जिल्ह्यातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.

Baramati News : नीरावागज परिसरातील 75 वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता; परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण

थंडी वाढताच तलावांच्या काठावर पहाटेच्या वेळी पक्ष्यांची रेलचेल अधिक गजबजलेली दिसते. छायाचित्रकारांना दुर्मिळ प्रजातींचे फोटो टिपण्याची संधी मिळते, तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून अभ्यास करण्याचा अनुभव मिळतो. स्थलांतरीत पक्ष्यांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण तयार होत असून निसर्गप्रेमींमध्येही त्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. आगामी काही आठवड्यांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा अभ्यासकांचा अंदाज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी पाहुण्यांचे आगमन पक्षीप्रेमींसाठी आनंददायी ठरणार आहे.

Web Title: Washim news the presence of foreign guest birds has started increasing in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:44 PM

Topics:  

  • Washim

संबंधित बातम्या

Washim News: ‘जागर स्त्री–पुरुष समानतेचा’ हा विशेष सप्ताह साजरा करण्यात आला!
1

Washim News: ‘जागर स्त्री–पुरुष समानतेचा’ हा विशेष सप्ताह साजरा करण्यात आला!

Washim Crime: ‘छाया मोहन’ नाव गोंदलेली, डोकं ठेचलेलं, कपडे फाटलेल्या अवस्थेत…; वाशिम रेल्वे स्टेशनजवळ आढळला महिलेचा मृतदेह
2

Washim Crime: ‘छाया मोहन’ नाव गोंदलेली, डोकं ठेचलेलं, कपडे फाटलेल्या अवस्थेत…; वाशिम रेल्वे स्टेशनजवळ आढळला महिलेचा मृतदेह

वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम
3

वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम

Washim News : आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा! अनुभवाधारित शिक्षण घेण्याची मौल्यवान संधी
4

Washim News : आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा! अनुभवाधारित शिक्षण घेण्याची मौल्यवान संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.