Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाचा छंद जोपासायला आम्‍ही सक्षम, शिकविण्‍याची गरज नाही; विखेंचा थोरातांना टोला

माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढविण्याची व्यक्त इच्छा केली होती. त्यांच्या या इच्छेवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेवर आता महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2024 | 02:09 PM
मंत्री विखेंचा आमदार थोरातांना टोला

मंत्री विखेंचा आमदार थोरातांना टोला

Follow Us
Close
Follow Us:

आमच्‍या मुलाचा छंद जोपासायला आम्‍ही सक्षम आहोत. याबाबत आम्‍हाला आमदार बाळासाहेब थोरातांनी (Balsaheb Thorat) शिकविण्‍याची गरज नाही, असा मिश्किल टोला महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढविण्याची व्यक्त इच्छा केली होती. त्यांच्या या इच्छेवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेवर आता महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

हेदेखील वाचा- उरण हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार – रूपाली चाकणकर

माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विधानसभा लढविण्याची व्यक्त इच्छा केली होती. सुजय विखे यांना विधानसभा निवडणूक लढविण्‍याबाबत विचारलं असता, त्यांनी सांगितलं होतं की, उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकारण खुप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर मी तयार आहे. माझे काम फक्‍त अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार मी पुढे निर्णय करणार आहे.

हेदेखील वाचा- गोंदिया जिल्ह्याला पावसाचा फटका; 20 लाख क्विंटल धान अद्यापही केंद्रातच

डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्‍याचे सुतोवाच केल्‍यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली होती. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील एका कार्यक्रमात बोलताना थोरातांनी म्हटलं होतं की, मोठ्यांचं लाडक लेकरु आहे ते, त्यांचा जर उभं राहण्याचा छंद असेल तर पक्षाने किंवा पालकांनी तो छंद पुरवावा. बाळासाहेब थोरात यांच्या या वक्तव्यावर आता राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

राधाकृष्‍ण विखे पाटील म्हणाले की, आपण तर सर्व घरदार राजकारणात उतरविलं आहे. भावापासून ते जावयापर्यंत सर्वच कुटुंब राजकारणात उतरवून तुम्‍ही तुमचे छंद पुर्ण केले आहेत. डॉ.सुजय हे निर्णय घेण्‍यासाठी सक्षम आहेत. त्‍यांच्‍या मनात काय विचार आहे तो योग्‍यच असेल. पण या तालुक्‍यात निर्माण झालेल्‍या हुकूमशहाने तालुका पुर्ण उध्‍वस्‍त केला आहे. केवळ ठराविक लोकांचा विकास झाल्‍याने तालुक्‍याचे काय झाले आहे, हे जनता रोज अनुभवत आहे. लोकांना आता नवीन चेहरा हवा आहे आणि तीच भावना लोकांनी आजच्‍या मेळाव्‍यातून व्‍यक्‍त केली आहे. लोकभावनेचा आदर करायचा हीच माझी भूमिका आहे. याबाबत पक्ष श्रेष्‍ठींना कळवून योग्‍यतो निर्णय ते करतील.

राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उमेदवारी बाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. डॉ.सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: We are able to cultivate a childs hobby radhakrishnan vikhe patil taunts balasaheb thorat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 02:09 PM

Topics:  

  • BJP
  • Congress

संबंधित बातम्या

Nashik Politics: नाशिकचं राजकारण तापणार; भाजपचे मिशन १०० प्लस तर एकनाथ शिंदे स्वबळावर
1

Nashik Politics: नाशिकचं राजकारण तापणार; भाजपचे मिशन १०० प्लस तर एकनाथ शिंदे स्वबळावर

शरद पवार गटाला मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
2

शरद पवार गटाला मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
3

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
4

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.