Maharashtra Rain Update: राज्यभरात आज मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज दिवसभरात राज्यातील सर्वच जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस कोसळला आहे. चिपळूण शहरात पुराचे पाणी देखील शिरले आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान अरवी समुद्राला उधाण आले आहे. समुद्र खवळललेला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये अति ते अति मुसळधार म्हणजेच अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी, पालघर, ठाणे व मुंबई यांसह अन्य जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळला असल्याने मच्छीमार बांधवांनी तसेच अन्य नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अरबी समुद्र खवळला असल्याने वाऱ्यांचा वेग वाढला आहे.
साताऱ्यात मुसळधार
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने नदीपात्रात 80 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापुरात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
19 Aug 2.30pm,#Mumbai & arnd rains in past 3 hrs & 6 hrs since 8.30 am today.
Heavy🟡 to very heavy🟠 RF recd with max towards #Vileparle sides. City side 40-70mm rains & NM 70-100mm.
Hvy to very hvy🟠intermittent RF very likly to cont in nxt 3,4hrs seen frm radar.
🔴Alert is ON pic.twitter.com/JIEKRjwmqs— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 19, 2025
कोकणात धुमशान
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिपळूण शहरात वाशिष्ट नदीचे पाणी शिरले होते. राजापूर शहरात देखील नदीचे पाणी सखल भागात साचले असल्याचे समोर आले होते.
पुण्यात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पानशेत, वरसगांव, टेमघर, खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात सायंकाळी ७ वाजता ३५ हजार ३१० इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 19, 2025
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात सायंकाळी ७ वाजता ३५ हजार ३१० इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे