Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Red Alert To Maharashtra: राज्यासाठी काही दिवस काळजीचे; कोकणात मुसळधार तर घाटमाथ्यावर…

हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात मोठ्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2025 | 06:19 PM
Red Alert To Maharashtra: राज्यासाठी काही दिवस काळजीचे; कोकणात मुसळधार तर घाटमाथ्यावर…
Follow Us
Follow Us:

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अवकाळी पावसाने झोडपून काढल्यावर मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात मोठ्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि सरकारने केले आहे. मान्सून वेळेआधीच मुंबईत दाखल झाला आहे.

येत्या २४ तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाचा जोर वाढू शकतो. येत्या काही दिवसांत मान्सूनचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढलेला दिसायला मिळणार आहे. कोकण विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या सर्व राज्यभर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागत तुफान पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. काही ठिकाणी कमी आहे. मात्र काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कोकण विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद

महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तब्बल 346 मिलिमीटर झाला आहे. मान्सून आगमनाच्या आधीच पावसाने एकूण आकडेवारीची एक तृतीयांश सरासरी गाठल्याने पुढील तीन महिन्यात पाऊस किती बरसणार का अतिवृष्टीचा जलवा पाहायला मिळणार यामुळे बळीराजा धास्तावला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामाची पावसामुळे उसंत मिळेनाशी झाली आहे.  सातारा जिल्ह्यात सरासरी 858.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

26 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हवामान खात्याचा अहवालानुसार महाबळेश्वर तालुक्यात तब्बल 346.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळीच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील बेंडा नदी लिंगमळा धबधबा व इतर नाले उसंडून वाहत आहेत.  पर्यटकांच्या आकर्षण असलेले धबधबे पुन्हा एकदा सजीव झाल्याने थंडीच्या सरी धोके याचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वर मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.

 

Web Title: Weather department gave alert to heavy rain kokan and all districts next few days in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Weather
  • Rain Alert

संबंधित बातम्या

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
1

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.