Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राणा दाम्पत्याचे जंगी स्वागत करत क्रेनने घातला हार, भीम ब्रिगेडने रोखले राणा दाम्पत्याला ! हा तर बेशरमपणाचा कळस – पालकमंत्री यशोमती ठाकूर

राणा दाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालिसा पठन करणार असल्याची माहिती भीम ब्रिगेडला प्राप्त झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार टाकण्यास नव्हे तर, त्या परिसरात हनुमान चालिसा पठन करू नये, म्हणून भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध करीत राणा दाम्पत्यास अडविण्याचा प्रयत्न केला. भीम ब्रिगेडने राणा दाम्पत्यास अडविल्याने यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

  • By Anjali Awari
Updated On: May 29, 2022 | 12:38 PM
Welcoming the Rana couple, Crane defeated them, Bhim Brigade stopped the Rana couple! This is the culmination of shamelessness - Guardian Minister Yashomati Thakur

Welcoming the Rana couple, Crane defeated them, Bhim Brigade stopped the Rana couple! This is the culmination of shamelessness - Guardian Minister Yashomati Thakur

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : नागपूर येथे जोरदार स्वागत झाल्यानंतर शहरात दाखल झालेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे शनिवारी (२८ मे) सायंकाळी ७.१५ वाजता शहरातील रहाटगाव चौकात जंगी स्वागत करण्यात आले. कारच्या सनरुफ मधून बाहेर निघत भगवी पगडी व दुपट्टा घातलेल्या दाम्पत्याने समर्थकांना अभिवादन करीत दोन्ही हात जोडून नमस्कार केला. यावेळी क्रेनच्या मदतीने गुलाब पुष्पहार घालत दोघांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रॅलीने वेलकम पाइंट तसेच पंचवटी चौकात पोहोचलेल्या राणा दाम्पत्याचे जोरदार स्वागत झाले. यावेळी झालेल्या गर्दीमुळे रहाटगाव चौक ते पंचवटी चौका पर्यंत तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली होती.

भीम ब्रिगेडने राणा दाम्पत्याला रोखले

पंचवटी चौकातून राणा दाम्पत्याची रॅली इर्विन चौकात पोहोचली. यावेळी वाहनातून उतरत राणा दाम्पत्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जात होते. राणा दाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालिसा पठन करणार असल्याची माहिती भीम ब्रिगेडला प्राप्त झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार टाकण्यास नव्हे तर, त्या परिसरात हनुमान चालिसा पठन करू नये, म्हणून भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध करीत राणा दाम्पत्यास अडविण्याचा प्रयत्न केला. भीम ब्रिगेडने राणा दाम्पत्यास अडविल्याने यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. प्रसंगावधान साधत पोलिसांनी भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राणा दाम्पत्यापासून दूर करीत ताब्यात घेतले. भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांच्यासह १९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 हा तर बेशरमपणाचा कळस –  पालकमंत्री यशोमती ठाकूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण जगाला मानवता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. त्यामुळे धार्मिक कट्टरता पसरविणाऱ्या लोकांनी राष्ट्रसंतांचे नाव घेत त्यांचा अपमान करु नये. असे कृत्य करणाऱ्या लोकांच्या त्यांच्या कृत्यावर शरम वाटायला हवी. मात्र, खालच्या स्तराचे राजकारण करणाऱ्या राणा दाम्पत्याने बेशरमपणाचा कळस गाठला असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Web Title: Welcoming the rana couple crane defeated them bhim brigade stopped the rana couple this is the culmination of shamelessness guardian minister yashomati thakur nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 12:38 PM

Topics:  

  • Adv. Yashomati Thakur
  • amaravati news

संबंधित बातम्या

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral
1

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा
2

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.