
फोटो सौजन्य: @CMOMaharashtra/ X.com
महाराष्ट्र हा नेहमीच संतांची, वीरांची आणि कलाकारांची भूमी राहिला आहे. न जाणो कित्येक कलाकारांनी देशाच्या इतिहासात आणि वर्तमानात मोठे योगदान दिले आहे. कला ही नेहमीच माणसाला जगवते आणि सर्जनशील बनवते. याच कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा सन्मान होणे महत्वाचे आहे. असाच एक महत्वाचा आणि प्रतिष्ठित सन्मान म्हणजे महाराष्ट्र भूषण!
यंदाचा महाराष्ट्र भूषण प्रख्यात शिल्पकार राम सुतार याना जाहीर झाला. राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी स्वतः राज्य सरकार राम सुतार यांच्या नोएडातील निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024’ हा मानाचा पुरस्कार प्रदान केला. या गौरवसोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राम सुतार यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आहे. त्यांच्या शिल्पकला आणि कार्याचा वारसा नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
Ratnagiri News : चिपळूण येथे भाजपला धक्का; निलेश राणे यांच्या निकटवर्तीयांची पक्षाला सोडचिठ्ठी
पुरस्कार स्वीकृतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना राम सुतार म्हणाले, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अतुलनीय गौरवाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आणि सर्वोच्च सन्मान आहे.”
शिल्पकलेसारख्या जटिल कलेला नव्या उंचीवर नेण्याचे काम सुतार यांनी केले आहे. देशातील अनेक महान नेते, महापुरुष आणि नामवंत व्यक्तिमत्त्वांची स्मरणरूप शिल्पे त्यांनी साकारली आहेत. त्यांच्या अप्रतिम शिल्पकृती भविष्यातील पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरतील, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच, “राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन या पुरस्काराचेही भूषण वाढले आहे,”* असेही शिंदे यांनी नमूद केले.
जगातील सर्वात उंच आणि भव्य शिल्प बनवण्याचे श्रेय सुद्धा राम सुतार यांना जाते. गुजरातमधील सरदार वल्लभाई पटेल यांचे 182 मीटरचे शिल्प म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ त्यांनीच घडवले. तसेच ते दादर मधील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी सुद्धा मार्गदर्शन करत आहे.
Ans: राम सुतार हे देशातील सर्वात प्रतिष्ठित शिल्पकारांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक महान नेते, महापुरुष आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची भव्य शिल्पे घडवली आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारखे जगप्रसिद्ध स्मारक त्यांच्या कलेचे सर्वोच्च उदाहरण आहे. त्यांच्या अद्वितीय कलेच्या आणि आयुष्यभराच्या योगदानामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण 2024 हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
Ans: राम सुतार यांनी देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण शिल्पे तयार केली आहेत. त्यात सर्वात प्रसिद्ध म्हणजे गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, जगातील सर्वात उंच शिल्प. याशिवाय त्यांनी नेते, महापुरुष, साहित्यिक आणि स्वातंत्र्यसैनिकांची अनेक भव्य स्मारके साकारली आहेत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीही ते मार्गदर्शन करतात.