Megablock
मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) रविवार १० जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Maintainance And Repair Work) आपल्या उपनगरीय विभागांत (Suburban Department) मेगाब्लॉक (MegaBlock) घोषित केला आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील (Slow Line) सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर (Down Fast Line) वळविण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. दरम्यान, मेगाब्लॉक पाहून प्रवास करण्याचे रेल्वेने आवाहन केले आहे.