Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी वर्णी का लागली? ही आहेत ५ प्रमुख कारणं

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि गेल्या ११ दिवसातील नाट्यमय घडामोडींनतर अखेर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 04, 2024 | 06:29 PM
देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी वर्णी का लागली? ही आहेत ५ प्रमुख कारणं

देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी वर्णी का लागली? ही आहेत ५ प्रमुख कारणं

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि गेल्या ११ दिवसातील नाट्यमय घडामोडींनतर अखेर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थिती भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिलं. त्याला सर्व आमदारांनी सहमती दर्शवली.

देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. इतक्या मोठ्या राजकीय घडामोडी आणि मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आणि महायुतीतून अनेक नावे चर्चेत असताना फडणवीस यांचीच मुख्यमंत्री म्हणून निवडण का करण्यात आली? असा प्रश्न काहींना पडला असेल, जाणून घेऊया त्यामागची नक्की कारणं कोणती आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या १० वर्षात वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणं इतकं सोप नव्हतं. निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र, एकनाथ शिंदे आणि पवार यांना सोबत घेऊन सत्तेचं समीकरणं साधायचं होतं.

महाराष्ट्रातील विजयाचे शिलेदार?

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. 2019 च्या निवडणूक निकालांनंतर शिवसेनेशी युती तुटल्यानंतर फडणवीस राज्याच्या राजकारणात राजकीय मुत्सद्देगिरीचं काम केलं आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि भाजपसोबत आले. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा त्याग करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फटू पडली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सरकारमध्ये सामिल करून घेतलं. शरद पवारांना हा मोठा राजकीय धक्का होता.

भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर ते मुख्यमंत्री

फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी पहिल्यांदा नागपूर महापालिका निवडणूक रामनगर प्रभागातून जिंकली. १९९७ मध्ये फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर बनले. त्यानंतर पहिल्यांदा १९९९ मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभेमधून निवडून आले. या मतदारसंघातून सलग दोनदा आमदार झाले. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चारदा विजयी झाले. १९९९ पासून तब्बल २० वर्ष ते विधानसभेत नागपूरचं प्रतिनिधित्व करत आहेत.२०१४ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते.
महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमुख घटक पक्ष आहेत. नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद भाजपकडे असलं तरी उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांकडे जाण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते आहेत आणि महाराष्ट्रातील राजकारणाची चांगली समज आहे. शिंदे-अजित पवार यांच्याशी राजकीय संतुलन राखण्यासाठी भाजपाला त्याच्याच तितक्याच ताकदीचा नेता हवा होता, त्यामुळे भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नव्हता.

फडणवीस आणि अजित पवार यांची चांगली राजकीय केमिस्ट्री आहे. तसेच शिंदे यांच्याशीही राजकीय समन्वय साधून फडणवीस चांगलं काम करू शकतात. अडीच वर्ष फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे शिंदेंना ते जवळून ओळखतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा राजकीय अनुभवाबद्दल फडणवीस परिचित आहेत. म्हणूनच भाजपने सत्तेची सर्व सूत्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहेत.

वरिष्ठ नेते, RSS च्या मर्जीतले नेते

देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतले मानले जातात. 2014 मध्ये भाजपने महाराष्ट्रात विजय मिळवला त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी नितीन गडकरी, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं. याचे कारण म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला शिवसेनेपासून वेगळे राहून एकट्याने निवडणुकीला सामोरं जायचं होतं. फडणवीस नागपूरमधून येतात, त्यामुळे संघाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना संघाशी संतुलन साधून काम केलं आहे. याशिवाय मोदी आणि अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपचे पोस्टर बॉय असलेले फडणवीस त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि लोकप्रिय आहेत.

Web Title: Why bjp choose devendra fadnavis as maharashtra new cm this 5 main reasons know it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • maharashtra New CM

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा
4

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.