
धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभा
धुळ्यात 143 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम
15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार
धुळे: राज्यात महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालजाहीर होणार आहेत. दरम्यान महायुतीचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावे त्यांनी धुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
धुळे येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत नागरिकांची गर्दी बागहीला मिळत आहे. पत्रकार दिनानिमित मी सर्व पत्रकार बंधुंना शुभेच्छा देतो. गिरीश महाजन यांनी तीन ते चार दिवस खूप काम केले. धुळे जिल्ह्यात महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. जी-जी आश्वासने मी दिली होती तीन पूर्ण करण्याचे काम केले.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “सुरुवातीला कमालच झाली. सुरुवातीला तुम्ही चौकार मारला आहे. आपले लोक बिनविरोध निवडून आले तर काही लोकांना मिरची लागते. तुमको को मिरची लगी तो मे क्या करू? संसदेत खासदार बिनविरोध आलेतर लोकशाही जिवंत अन् धुळ्याच्या जनतेने चार नगसेवक बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असे म्हणणाऱ्यांचे डोके कुठे आहे ते सांगायला नको.”
“धुळेकरांनी विकास हा भाजपच्या काळात पाहिला. दोन वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. धुळ्यातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचवणार. 143 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. ”
पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
“पुण्यात जवळपास 3 हजार कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या विकासकामे सुरू केली. शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क निर्माण करतोय. यामध्ये एआयचा वापर करून पुण्याला सुरक्षित करण्याचे काम करणार आहोत. आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तर निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुणे मेट्रोच्या घोषणा झाल्या , पण काम होत नव्हते. त्यानंतर आम्ही ठाम निर्णय घेत मेट्रोचे कामे सुरू केले. आज पुण्यात 110 किलोमीटरचे नेटवर्कचे काम करतोय. 33 किलोमीटर पूर्ण झाले आहे. 24 किलोमीटर टप्प्यात आहे. यामुळे दळणवळण सोपे होणार आहे.
Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
पुणे शहराचा विचार केला तर हे शहर देशातील सर्वात वेगवान विकास होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीएचा वेगाने विकास होत आहे. पुणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून आपण पाहतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पुणे एक वेगाने विकास होणारे शहर म्हणून पुढे येत आहे.