Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

धनंजय मुंडे यांच्या आईबाबतही आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केला होता. त्याला आता धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 09, 2025 | 11:50 PM
धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

धनंजय मुंडे यांच्या आईबाबतही आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केला होता. धनंजय मुंडे हे वाल्मीक कराड यांच्या प्रचंड आहारी गेले होते. वाल्मीक कुणाचं काही एक चालू देत नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडें यांच्या कुटुंबातले लोकही नाराज झाले होते. शिवाय त्यांची आई ही नाथरा या मुळ गावी शेतात राहण्यासाठी गेली होती असं धस यांनी सांगितलं होतं. त्याला आता धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्या मागे सत्य काय आहे हेच त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच…

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 9, 2025

धनंजय मुंडे यांच्या आई ही त्यांच्यावर नाराज होत्या असं सांगण्याचा प्रयत्न सुरेश धस यांनी केला. त्यातून त्या गेल्या दिड वर्षापासून त्यांच्या मुळ गावी म्हणजे नाथ्रा इथं राहायला गेल्या होत्या. त्या गावातील शेतात असलेल्या घरात राहात होत्या, असं धस यांनी सांगितलं. याला आता धनंजय मुंडे यांच्यावतीने उत्तर देण्यात आले आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे थेट उत्तर दिले आहे. शिवाय आई शेतात रहायला का गेली त्या मागचं कारण ही दिलं आहे.

ते लिहीतात, परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत. तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले, आणि खोटेनाटे आरोप केले. असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणतात, माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात. हेही सर्वांना माहित आहे. मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केले गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे. असं ही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या आहेत. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली. शंका निर्माण केल्या गेल्या. तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे. राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत आहे. असं शेवटी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Why dhananjay mundes mother went to her native village nathra what is the truth dhananjay munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Suresh Dhas
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला
1

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला

Dhananjay Munde News: मुंबईत १६ कोटींचे आलिशान घर, तरीही सोडवेना सरकारी बंगला…; धनंजय मुंडे खोटं बोलले?
2

Dhananjay Munde News: मुंबईत १६ कोटींचे आलिशान घर, तरीही सोडवेना सरकारी बंगला…; धनंजय मुंडे खोटं बोलले?

Dhananjay Munde News: राजीनाम्याच्या पाच महिन्यांनंतरही धनंजय मुंडेंना सोडवेना ‘सातपुडा’ बंगला; ४२ लाखांचा दंड प्रलंबित
3

Dhananjay Munde News: राजीनाम्याच्या पाच महिन्यांनंतरही धनंजय मुंडेंना सोडवेना ‘सातपुडा’ बंगला; ४२ लाखांचा दंड प्रलंबित

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
4

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.