Ramtek Bungalow History: महायुतीच्या नवनिर्वाचित नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नुकतेच खातेवाटपही झाले. त्यानंतर काल रात्री मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले. पण या बंगल्याचे वाटप झाल्यानंतरही अनेक नेत्यामंधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. खरंतर रामटेक बंगला हा मलबार हिल्सवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेला बंगला. पण या बंगल्याबाबत अनेक समजूती- गैरसमजूती आहेत. बंगल्याशी संबंधित अनेक घडामोडी घडल्याने अनेक मंत्र्यांनी हा बंगला घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
यंदाच्या शासकीय निवासस्थान वाटपात रामटेक बंगला हा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाट्याला आहे. पण राजकीय वर्तुळातही या बंगल्याबाबत शुभ-अशुभाची चर्चा सुरू आहेत. यापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ, दिपक केसरकर आणि एकनाथ खडसे या नेत्यांचं बंगल्यात वास्तव्य होतं पण मंत्रिमंडळ विस्तारात या तीनही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे या बंगल्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बानवकुळे हा बंगला स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; संयुक्त परीक्षेबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना रामटेक बंगला देण्यात आला होता. मात्र, तेलगी मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या प्रकरणात भुजबळ बचावले असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रामटेक बंगल्यात राहत असताना विलासराव देशमुख यांना १९९५ च्या लातूरच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांना रामटेक सोडावे लागले. मात्र, पुढच्याच वर्षी 1996 मध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीत निम्म्या मतांमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर देशमुखांचे राजकीय पुनर्वसन व्हायला चार वर्षे लागली.
1999 मध्ये रामटेक बंगला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार नेते छगन भुजबळ यांना देण्यात आला होता, तेलगी घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यावर एकनाथ खडसे यांना मंत्री बनवून त्यांना रामटेक बंगला देण्यात आला. मात्र काही दिवसांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले, त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर हा बंगला बराच काळ रिकामा होता आणि कोणीही हा बंगला घेण्याची इच्छा व्यक्त केली नाही. 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार स्थापन झाल्यावर छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री बनवून रामटेक बंगला घेण्याची चर्चा झाली. तत्कालीन ठाकरे सरकारने छगन भुजबळांना रामटेक बंगला दिला होता, पण दरम्यानच्या काळात अडीच वर्षांत महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि छगन भुजबळांना मंत्रिपदासह बंगला सोडावा लागला.
अमेरिकेची चिंता वाढली, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 25 नागरिकांना सुनावली शिक्षा;
एकनाथ खडसे : युती सरकारच्या काळात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता. पण त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकार कोसळल्यानंतर रामटेकचा बंगला एकनाथ खडसे यांच्याकडे गेला. मुख्यमंत्र्यांनंतर एकनाथ खडसे हे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली मंत्री होते. मात्र दीड वर्षातच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना हा बंगला आणि मंत्रीपद दोन्ही सोडावे लागले. मंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्याच्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी रामटेक येथे वास्तुदोष पूजा करून घेतली होती, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
या बंगल्यात शंकरराव चव्हाण राहत होते. जे नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि वर्षा बंगल्यात गेले. त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांचे बालपण या बंगल्यात 12 वर्षे गेली. पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले.