Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेशन धान्याची सर्रास बाजारात विक्री; अन्नपुरवठा विभाग अनभिज्ञ? शासनाच्या योजनेला धक्का

रेशनवर मिळणारे तांदूळ-गहू अनेक लाभार्थ्यांकडूनच खुलेपणाने बाजारात विकले जात असल्याच्या चर्चा असून, या गैरप्रकाराबाबत स्थानिक अन्नपुरवठा विभाग अनभिज्ञ असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 07, 2025 | 05:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक अन्नपुरवठा विभागाला याची कल्पना नसल्याचा प्रश्न उपस्थित
  • गव्हासाठी २२ रुपये प्रति किलो या नाममात्र दरात उपलब्ध
  • तांदूळ व गहू खुलेपणाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याच्या चर्चाही रंगत
गरीब आणि गरजूंना दोन वेळच्या जेवणाची चिंता मिटावी, या हेतूने केंद्र व राज्य शासनाद्वारे रेशन दुकानदारांमार्फत मोफत तसेच नाममात्र दरात धान्य पुरवले जाते. परंतु काही रेशनकार्डधारक स्वतःस मिळणारे धान्य बाजारात विक्री करीत असल्याची माहिती समोर येत असून, शासनाच्या या संवेदनशील योजनांना हरताळ फासल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. सर्वांत आश्चर्य म्हणजे, ही विक्री सर्रास होत असतानाही स्थानिक अन्नपुरवठा विभागाला याची कल्पना नसल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Health Sciences University Scam: बनावट पावत्यांचा खेळ; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठा आर्थिक अपहार

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरीब कुटुंबांसाठी दोन गट आहेत. अंत्योदय (पिवळे कार्ड) व प्राधान्य कुटुंब (केशरी कार्ड). अंत्योदय गटाला दरमहा ३५ किलो धान्य (गहू आणि तांदूळ) तसेच पूर्वी १ किलो साखर दिली जात होती. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ दिले जाते. हे धान्य तांदळासाठी २५ रुपये तर गव्हासाठी २२ रुपये प्रति किलो या नाममात्र दरात उपलब्ध आहे. शिवाय केंद्राच्या मोफत धान्य योजनेचाही लाभ या कुटुंबांना सातत्याने देण्यात येतो.

मात्र, अनेक लाभार्थी हेच धान्य स्वस्तात घेऊन बाजारात व्यापारी किंवा इतर ग्राहकांना विकत असल्याचे समोर येत आहे. रेशन दुकानातून मिळणारे धान्य चोरीछुपे विकले जात असल्याने शासनाच्या सबसिडीचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थ्यांऐवजी व्यापाऱ्यांना मिळत असल्याची परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी तांदूळ व गहू खुलेपणाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याच्या चर्चाही रंगत आहेत.

या प्रकरणात सर्वात गंभीर मुद्दा असा की, वारंवार अशा घटना घडूनही अन्नपुरवठा विभागाकडे कोणतीही ठोस माहिती नाही किंवा त्यांनी तपासाची कोणतीच कार्यवाही सुरू केल्याचे दिसत नाही. प्रश्न असा उपस्थित होत आहे की, लाभार्थ्यांकडून होत असलेली ही अनधिकृत विक्री खरोखरच विभागाच्या लक्षात येत नाही की जाणूनबुजून डोळेझाक केली जात आहे?

Manoj Jarange Patil : सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा…; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

जनतेसाठी चालविलेल्या लोकहिताच्या योजनेतून काहीजण फायदा करून घेत असल्याने शासनाच्या उद्देशाला मोठा धक्का बसत आहे. या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी पुरवठा विभागाने तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title: Widespread sale of ration grains in the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • Ration Card

संबंधित बातम्या

मोफत रेशन घेणाऱ्यांची घरं होणार लालेलाल! अर्थशास्त्रज्ञांच्या कल्पनेने होईल रेशनकार्ड धारकांचे हाल
1

मोफत रेशन घेणाऱ्यांची घरं होणार लालेलाल! अर्थशास्त्रज्ञांच्या कल्पनेने होईल रेशनकार्ड धारकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.