महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठा आर्थिक अपहार (Photo Credit - X)
असा झाला घोटाळा
विद्यापीठाच्या परिक्षा विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सिताराम कडू यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर परदेशात शिक्षणासाठी जावू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या ट्रान्स्क्रीप्ट कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच विद्यापिठाने दिलेल्या प्रमाणपत्रांतील नावातील दुरूस्ती, कागदपत्रांचे साक्षांकन आदी कामांसाठी विद्यापीठाकडून शुल्क आकारणी केली जाते. सदरचे काम हे कक्ष अधिकारी विजय मधुकर जोंधळे, वरिष्ठ लिपीक सुरद्र मारूती रोकडे व शिपाई अर्चना प्रकाश निकम यांच्यामार्फत केले गेले.
विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले शुल्काची रितसर विद्यापीठामध्ये भरणा करण्याऐवजी या तिघांनी संगनमत करून या शुल्काच्या बनावट पावत्या तयार केल्या व सुमारे एक कोटी, ५३ लाख, १० हजाराची रक्कम परस्पर आपल्या बैंक खात्यात वर्ग करून रकमेचा अपहार केल्याची बाब विद्यापीठाच्या अंतर्गत तपासणीत उघडकीस आली.
बडतर्फी आणि निलंबन
याप्रकरणी विद्यापीठाने चौकशी सरू केली असता, त्यात उपरोक्त तिन्ही कर्मचारी दोषी आढळून आल्यावर जोंधळे, रोकडे व निकम या तिघांनाही प्रारंभी निलंबित करण्यात आले होते. त्यांची अधिक चौकशी केल्यावर विजय जोंधळे यांचा या प्रकरणातील सहभाग अधिक उघड झाल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला तर सुरेंद्र रोकडे व अर्चना निकम यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले.
व्यापती वाढल्याने तक्रार
दरम्यान, अपहाराची रक्कम विद्यापीठाला भरून देण्यासाठी संबंधितांना मुदत देण्यात आली. या मुदतीत विजय जीवळे यांनी सुमारे ७० लाखाचा भरणा केला. परतु गुन्ह्याची व्याती लक्षात आल्यावर ही रक्कम दीड कोटीच्या घरात गेल्याचे लक्षात आल्यावर विद्यापीठाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशीरा म्हसरूळ पोलिसात डॉ. संदीप कडू यांनी फिर्याद दिली. यधकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक बळवंत गावीत करीत आहेत.






