
“धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि अजित पवारांनी...”; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बीडसह विरोधी पक्षनेत्यांकडूनही केली जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 51 दिवस उलटून गेले असून, धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागली आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन काही महत्त्वाचे पुरावे सादर केल्याचा दावा केला. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागण्या होत असतानाच आज ते अचानक राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना झाले. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. पण दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल, तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी तत्काळ राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवू शकतात. गेल्या 51 दिवसांपासून मला टार्गेट केले जात आहे.”
Govind Pansare case: कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
नैतिकतेच्या मुद्द्यावर ते स्वतःहून राजीनामा देतील का, असा प्रश्न विचारला असता मुंडे म्हणाले, “माझी नैतिकता माझ्या लोकांप्रती प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मला नैतिकदृष्ट्या दोषी असल्याचे वाटत नाही. जर दोषी असेल, तर माझे वरिष्ठ मला तसे सांगतील.”
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार असल्याच्या चर्चांना सुरू झाल्या होत्या याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. “मंत्रिपद वाचवण्यासाठी शेवटी दिल्लीतच जावं लागतं,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Digital Arrest Scam म्हणजे काय? त्यात तुम्ही कसे लुटले जाता? वाचा सविस्तर बातमी
संजय राऊत म्हणाले, “अजित पवार गटाचे मंत्री खुलासा द्यायला दिल्लीत अमित शहांकडे जात आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई, बारामती आणि पुण्यात असताना त्यांच्या पक्षाचा मंत्री दिल्लीत जातो, ही महाराष्ट्राची दुर्दैवी अवस्था आहे.” यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. “महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. ते भाजपचे स्टार प्रचारक आहेत आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने जिंकलेल्या जागांचे श्रेय त्यांना मिळते. जर महाराष्ट्राचा फॉर्म्युला दिल्लीतच ठरणार असेल, तर भाजपने प्रचार न करताच निवडणुका जिंकाव्यात,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.