Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालणार; लोकसभा अध्यक्षांनी केले आश्वासित

काही विधीमंडळाचे विषय होते जे लोकसभा आणि विधीमंडळाच्या कार्यक्रमाशी संबंधित असून त्याबद्दल मी ओमप्रकाश बिर्ला यांच्याशी चर्चा केली. त्याठिकाणी बिर्लांचे मुख्यमंत्र्यांसोबतही बोलणे चालले होते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले आणि त्यांनी येऊन पुष्पगुच्छ दिला. एकनाथ शिंदे तिथे होते ही वस्तूस्थिती आहे. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली आणि मला करायचीही नव्हती, असे नीलम गोऱ्हेंनी सांगितले.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 19, 2022 | 09:10 AM
महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालणार; लोकसभा अध्यक्षांनी केले आश्वासित
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) भेट झाल्याचे समोर येत आहे. गोऱ्हे आणि शिंदें यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याचे मान्य केले.

मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ही भेट नेमकी कोणत्या पद्धतीची होती, असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांना विचारला. त्यावर गोऱ्हे यांनी पहिल्याच वाक्यामध्ये या भेटीचे उलट-सुलट अर्थ काढण्याची गरज नाही असे अधोरेखित केले. मुळात तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती वेगळ्या स्वरुपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांच्या भेटीसाठी गेले होते. ते सध्या मुंबईत आहेत. तसेच, मी जेव्हा तिथे गेले तेव्हा १० व्या मजल्यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर लोक त्यांच्यापाशीच बसलेले होते, असा खुलासाही नीलम गोऱ्हेंनी केला.

#आज लोकसभा @loksabhaspeaker जी मुंबई मे पधारे थे,ऊनका स्वागत पुष्प गुलदस्ता देकर किया।मैंने श्रद्धा वालकर के दर्दनाक हत्या के बारेमें निवेदन दिया ।स्पिकरजीने संवेदनशीलतासे मुझे सहयोग आश्वासित किया।ईस समय ऊन्हे मिलने के लिए @mieknathshinde @rahulnarwekar
ऊपस्थित थे। @MahaDGIPR pic.twitter.com/eH4KQzP383
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 18, 2022

ओम प्रकाश बिर्लां यांच्याकडे मला निवेदन द्यायचे होते, शुभेच्छा द्यायच्या होत्या. तसेच काही विधीमंडळाचे विषय होते जे लोकसभा आणि विधीमंडळाच्या कार्यक्रमाशी संबंधित असून त्याबद्दल मी ओमप्रकाश बिर्ला यांच्याशी चर्चा केली. त्याठिकाणी बिर्लांचे मुख्यमंत्र्यांसोबतही बोलणे चालले होते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आले आणि त्यांनी येऊन पुष्पगुच्छ दिला. एकनाथ शिंदे तिथे होते ही वस्तूस्थिती आहे. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली आणि मला करायचीही नव्हती, असे नीलम गोऱ्हेंनी सांगितले.

श्रद्धा वालकर प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून मदत हवी
जे निवेदन झाले त्या निवेदनाच्या आधारे बातमी पण मी दिलेली आहे. पुरातत्व विभागाने अजून सक्रीय काम करायला पाहिजे, श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील नेमले गेले पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या मी केल्या होत्या, ज्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्याकडून मदत हवी होती. या सगळ्या मुद्द्यावर बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही म्हणजेच महाराष्ट्र सरकारसुद्धा त्यामध्ये निश्चितपणाने पाऊल उचलेल. कठोर कारवाई करु असे ते म्हणाले, असेही नीलम गोऱ्हेंनी सांगितले.

Web Title: Will neelam gorhe join the shinde group discussion with chief minister after meeting in trident nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2022 | 09:10 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Neelam Gorhe
  • Rahul Narvekar
  • Trident Hotel

संबंधित बातम्या

मुंबई पुन्हा दहशवाद्यांच्या निशाण्यावर? ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस हाय अलर्टवर
1

मुंबई पुन्हा दहशवाद्यांच्या निशाण्यावर? ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस हाय अलर्टवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.