Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांनो सक्षम, साक्षर होत स्वत: चे अस्तित्व जपा – अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन

राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यासपीठावरून हजारो महिलांशी संवाद साधला. तसेच कल्पतरु प्रभाग संघ कुर्हा यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Development Mission ) अंतर्गत पंचायत समिती तिवसा (Panchayat Samiti Tivasa ) तर्फे आयोजित कुर्हा येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 28, 2022 | 03:50 PM
Women should protect their existence by becoming competent, literate - Adv. Assertion by Yashomati Thakur

Women should protect their existence by becoming competent, literate - Adv. Assertion by Yashomati Thakur

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : बचत गटामुळे (Savings group) महिलांना संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करा. सक्षम आणि साक्षर दोन्हींमध्ये अव्वल राहत महिलांनो स्वत:चे अस्तित्व जपा असा मौलिक सल्ला माजी महिला व बाल विकास मंत्री (Former Women and Child Development Minister ) अ‍ॅड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी महिलांना दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Development Mission ) अंतर्गत पंचायत समिती तिवसा (Panchayat Samiti Tivasa ) तर्फे आयोजित कुर्हा येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तिवसा पंचायत समिती यांच्यामार्फत कल्पतरु प्रभाग संघ कुर्हा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे पार पडली. या कार्यक्रमास तिवसा मतदार संघाच्या आमदार तथा राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी त्यांनी व्यासपीठावरून हजारो महिलांशी संवाद साधला. तसेच कल्पतरु प्रभाग संघ कुर्हा यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केले. कल्पतरू प्रभागसंघ अंतर्गत समाविष्ट सोळा ग्रामपंचायतीमध्ये २३ ग्रामसंघाअंतर्गत ४१६ स्वयं सहाय्यता बचत गटामध्ये समाविष्ट ४,१५९ कुटुंबाना फिरता निधी, २१४ बचत गटांना रुपये ३१.९२ लाख एवढा निधी प्राप्त झाला. तसेच समूह कर्ज म्हणून २१४ गटांना रुपये ३२.१ लाख मिळाले. तसेच कल्पतरू प्रभागसंघ कुर्हा येथील १,२९४ महिलांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा काढले.

तसेच, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना संख्या २,३१२ तसेच ग्रामसंघांना ग्रामसंघ व्यवस्थापन निधी प्राप्त रु ६.५ लाख मिळाले. तसेच, जोखीम प्रवणता निधी रु ७५ हजार मिळाले. तसेच उकऋ ८ समूह ३.६० लाख रु मिळाले. तसेच कल्पतरू प्रभाग संघ अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेत ११ स्वयं सहाय्यता बचत गटांना ५.२० लाख रुपये मिळाले. याबद्दल ठाकूर यांनी कल्पतरु प्रभागसंघातील सर्व महिलांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Web Title: Women should protect their existence by becoming competent literate adv assertion by yashomati thakur nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 03:50 PM

Topics:  

  • Adv. Yashomati Thakur
  • amaravati news

संबंधित बातम्या

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral
1

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा
2

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.