Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Majhi Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना परत द्यावे लागणार योजनेचे पैसे? ‘ते’ हमीपत्र वाढवणार अडचणी

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशी पाच महिन्यांचे जवळपास 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमाही झाले. निवडणुकीपूर्वीच महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 11, 2024 | 12:31 PM
'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन

'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  जुलै महिन्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. त्यानंतर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील राज्यभरातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ लागले. विशेष म्हणजे या योजनेची तत्काळ अंमलबजावणी झाल्याने  महिलांच्या खात्याच पैसेही जमा होऊ लागले. विधानसभा निवडणुकीपर्यंत जवळपास 7500 रुपये महिलांच्या  खात्यात जमा झाले. महायुतीला या योजनेचा फायदाही झाला. निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा मोठा विजय झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

निवडणुकीनंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेतंर्गत आलेल्या अर्जांची पडताळणी सुरू कऱण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्याकडून एक हमीपत्रही लिहून घेण्यात आले होते. ज्या कुटुंबांचे एकत्रित उत्पन्न अडिच लाख रूपयांपेक्षा कमी आहे, त्याचे कुटुंब आयकर भरत नाही, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही, आणि कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरपेक्षा कमी  शेतजमीन आहे. आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नाही, असे हमीपत्रात लिहून देण्यात आले होते. आता या हमीपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे.  त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.

BJP National President : कोण होणार भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष? ‘ही’ दोन नावे चर्चेत

विशेष म्हणजे, या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील जवळपास अडिच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशी पाच महिन्यांचे जवळपास 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमाही झाले. निवडणुकीपूर्वीच महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.

पण निवडणुकीनंतर आता डिसेंबर महिन्याचा हफ्ता जमा करण्यापूर्वी राज्य सरकारने महिलांकडे गाव, तालुका, जिल्हा पातळीवर उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रं महिलांकडून मागितली जात आहेत. ही कागदपत्रे पडताळणींनंतर अनेक महिला या योजनेतून  बादो होऊ शकतात. अशी शक्यता आहे. त्यामुळे महिलांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. अनेक महिलांकडून उत्तपन्नाचा दाखला मागल्ने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे लाडकी बहिणीच्या हमीपत्रात?

मी घोषित करते की…

माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नाही,

माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.

मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितर/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समानिवृतीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु.१,५००/- पेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.

माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किया माजी खासदार/आमदार नाही.

मोठी बातमी ! सोलापुरातील ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसला धक्का; सहा पानांचा राजीनामा देत

माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपरिशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.

माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.

माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.

मी वरीलप्रमाणे घोषित करते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा यतः टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.

  • (अर्जदाराची सही)

 

 

Web Title: Women will have to repay the money from the ladkya bhahin scheme the guarantee will increase the difficulties nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • Maharashtra Women's
  • majhi Ladki Bahin yojna

संबंधित बातम्या

Pune News: मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी कोट्यवधी खर्च अन् लाडक्या बहिणींसाठी निधीची टंचाई; सामाजिक कार्यकर्त्याची टीका
1

Pune News: मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी कोट्यवधी खर्च अन् लाडक्या बहिणींसाठी निधीची टंचाई; सामाजिक कार्यकर्त्याची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.