Photo Credit- Social Media
Mumbai News : निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपने पुन्हा संघटनात्मक पातळीवर बदल करण्यास सुरूवात केली आहे. याची सुरूवात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीपासून होणार आहे. जे.पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता भाजपमध्ये आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारीपासून अध्यक्षपदाच्या निवडीची प्रकिया सुरू होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आहे.
मधल्या काळात भाजपच्या पक्षाध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील विनोद तावडे यांचे नाव चर्चेत होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्यांचा सक्रीय सहभागही होता. पण सध्या त्यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याचे नाव या चर्चेतून वगळण्यात आले आहे. विनोद तावडे यांचं नाव या यादीतून वगळल्यानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावे पक्षाध्यक्ष पदाच्या चर्चेत आहेत.
फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होईल. जे.पी. नड्डा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने फेब्रुवारीच्या आधीच भाजपच्या पक्षाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.
दुसरीकडे भाजपकडून आता देशभरात सदस्य नोंदणीची मोहीम राबवली जात आहे. 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी केली जाणार आहे. यासोबतच पक्षांतर्गत निवडणुकाही होणार आहेत. त्यासाटी मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या सुरू झाल्या आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या होणार आहेत. राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. 15 जानेवारी पर्यंत प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
अचानक स्फोट होताच रस्त्याच्या आत खेचली गेली तरुणी, थरारक अपघात अन् धडकी