Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिपळूणातील उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात; काेकणातील गणेशभक्त, चाकरमान्यांसाठी पूल खुला होणार?

तब्बल ९५ पिलर असलेला १८०० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदी असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त लांबीचा हा पूल ठरणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 12, 2026 | 04:24 PM
चिपळूणातील उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात

चिपळूणातील उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात

Follow Us
Follow Us:

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचा प्रकल्प आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा चिपळूण बहादूरशेख ते प्रांत कार्यालय या उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, आगामी दोन महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी हा पूल खुला व्हावा, यासाठी संबंधित ठेकेदार कंपनी व प्रशासन प्रयत्न करत आहेत.या पुलाच्या निमित्ताने मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहे.

चिपळूण शहरांतर्गत येणाऱ्या महामार्गावर बहादूरशेख ते प्रांत कार्यालय या सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक व रहिवाशी संकुल असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा, या मागणीची दखल घेऊन या मार्गावर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला व रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला पुलाचे काम देण्यात आले होते. काम सुरू होऊन दोन ते तीन गर्डर चढवण्यात आले. मात्र, काम सुरू असतानाच गर्डर कोसळले. शासनाने तत्काळ दखल घेऊन पुलाचा संपूर्ण आराखडा रद्द करून नवीन पुलाचा आराखडा तयार करण्यात आला व कामाला नव्याने सुरुवात करण्यात आली.

महामार्गावरील महत्वाचा प्रकल्प

तब्बल ९५ पिलर असलेला १८०० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदी असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त लांबीचा हा पूल ठरणार आहे. बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाला जोडूनच हा उड्डाणपूल होत असून चिपळूण प्रांत कार्यालयाच्या पुढे मुख्य महामार्गाला हा उड्डाणपूल जोडला गेला आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने दिवसरात्र हे काम सुरू ठेवल्याने जलद वेगाने हे काम पूर्णत्वाकडे जात असून, आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

गणेशोत्सवात प्रवास होणार सुकर

पुलाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.उर्वरित १० टक्के काम येत्या २ महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रांत कार्यालयाकडील काही गर्डर आणि मुख्य रस्त्याला जोडरणारा जोड रस्ता इतकेच काम आता शिल्लक राहिले असून गणेशोत्सवापूर्वी हे काम मार्गी लागण्याची श्यक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास या उड्डाणपुलावरून होणार आहे.

वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प

Web Title: Work on the chiplun flyover is in the final stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • ratnagiri news

संबंधित बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद
1

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.