Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-लोणावळा तिसऱ्या-चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या कामाला आता वेग येणार; राज्य सरकारकडून 5100 कोटींची तरतूद

रेल्वे विभागाने यापूर्वीच सर्वेक्षण पूर्ण केले असून, आवश्यक जमीनही उपलब्ध आहे. राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने काम रखडले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2026 | 03:09 PM
पुणे-लोणावळा तिसऱ्या-चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या कामाला आता वेग येणार; राज्य सरकारकडून 5100 कोटींची तरतूद

पुणे-लोणावळा तिसऱ्या-चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या कामाला आता वेग येणार; राज्य सरकारकडून 5100 कोटींची तरतूद

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील बहुप्रतिक्षित तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामातील आर्थिक अडसर आता दूर झाला आहे. राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 5100 कोटी रुपयांची मोठी तरतूद केल्याने, रेल्वे मंत्रालयाने आता या कामाला तातडीने गती द्यावी, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

नवी दिल्ली येथे खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित होते. पुणे ते लोणावळा दरम्यान सध्या दोनच ट्रॅक उपलब्ध असून, त्यावरुनच मालवाहू गाड्या, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस आणि उपनगरीय लोकल धावतात. यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात मर्यादा येत आहेत. खासदार बारणे यांनी स्पष्ट केले की, “या मार्गावरून दररोज सुमारे सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. २०१७ मध्येच या मार्गावर अतिरिक्त दोन ट्रॅक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, निधीअभावी हे काम रखडले होते.”

दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारची प्रत्येकी ५० टक्के हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे विभागाने यापूर्वीच सर्वेक्षण पूर्ण केले असून, आवश्यक जमीनही उपलब्ध आहे. राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने काम रखडले होते. मात्र, महायुती सरकारने दुसऱ्या अर्थसंकल्पात ५१०० कोटींची तरतूद करून या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.

“राज्य सरकारने आपला वाटा उचलल्याने आता रेल्वे मंत्रालयाने तातडीने पावले उचलून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी विनंती मी रेल्वेमंत्र्यांना केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच काम वेगाने सुरू होईल अशी ग्वाही दिली आहे.”

– श्रीरंग बारणे, खासदार

प्रकल्पाचे फायदे

  1. फेऱ्यांमध्ये वाढ : तिसरा आणि चौथा ट्रॅक झाल्यास लोकल गाड्यांची संख्या दुप्पट करणे शक्य होईल.
  2. वेळेची बचत : एक्स्प्रेस आणि लोकल ट्रॅक वेगळे झाल्याने गाड्यांच्या विलंबाचा प्रश्न सुटेल.
  3. प्रवासी सुविधा : मावळ आणि पुणे परिसरातील नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुकर होईल.
Chhatrapati Sambhajinagar: भाजपचे अनिल मकरिये स्थायी समिती सभापतीपदी विजयी; एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव

Web Title: Work on the pune lonavala 3rd and 4th railway tracks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Pimpri News
  • Shrirang Barne

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.