
शिंदे शिवसेनेते अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश
राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा सेनेला धक्का
ठाणे येथे शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पालघरमधील शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक शिल्पा बाजपेयी, उबाठा गटाचे शिवसेना सचिव अमर द्विवेदी, माजी नगरसेवक अमर बाजपेयी, महिला मंडळाच्या श्वेता दुबे, ऋषी शुक्ला, माजी नगरसेवक संजय गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
66 शिवसेना जनसेवेचा म्हणजे मार्ग विकासाची आहे. पालघर ताकद आणि आणि डहाणू या दोन्ही नगरपरिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकवणे हेच आपले पुढील ध्येय असावे, जनतेला कोण विकास करतेय, हे माहीत आहे. विजय हा आपलाच होणार आहे – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
डहाणुतील राजकीय समीकरण बदलणार
डहाणूतील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. अमित नहार यांनीही आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. नहार यांनी मागील डहाणू नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून सुमारे चार हजारांहून अधिक मते मिळवली होती. त्यांच्या प्रवेशामुळे डहाणू शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
डहाणूत भाजपा पदाधिकारी सेनेत
जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेत गेल्या अनेक महिन्यांपासून रोजच्या रोजच्या रोज पक्ष प्रवेश होत असून, डहाणूतील आंबेसरी जिल्हा परिषद गटातील अॅड, देवू नारले यांच्यासह शेकडो भाजप, उबाटा, कम्युनिस्ट पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची आंबेसरी जिल्हा परिषद गटात ताकद वाढली असून, येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.