Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरण हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार – रूपाली चाकणकर

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यशश्री शिंदेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडील व नातेवाईकांची भेट घेतली आहे आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच उरण हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार, असं देखील चाकणकर यांनी यावेळी सांगितलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2024 | 10:47 AM
रुपाली चाकणकरांनी यशश्री शिंदेच्या कुटूंबियांची भेट घेतली

रुपाली चाकणकरांनी यशश्री शिंदेच्या कुटूंबियांची भेट घेतली

Follow Us
Close
Follow Us:

उरणमध्ये झालेल्या यशश्री शिंदे हत्याकांडामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यशश्री हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेखला शिक्षा व्हावी यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. दाऊद शेखला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्व राजकीय पक्ष व विविध संघटना व संस्थांनी उरण पोलीस स्टेशनवर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यशश्री शिंदेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडील व नातेवाईकांची भेट घेतली आहे आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच उरण हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार, असं देखील चाकणकर यांनी यावेळी सांगितलं.

हेदेखील वाचा- यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू! एक टॅटू दाऊदच्या नावाचा, टॅटू आर्टिस्ट पोलिसांच्या रडारवर

यशश्रीच्या आई वडीलांनी रुपाली चाकणकर यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि यशश्रीला न्याय मिळवून देण्याची विनंती केली. यशश्रीला न्याय मिळवून देणार आणि या हत्याकांडातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार, असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी यशश्रीच्या आई-वडीलांना दिलं.

हेदेखील वाचा- उरण हत्याकांड प्रकरण: यशश्रीची हत्या का केली?; दाऊद शेख पोपटासारखा बोलायला लागला

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर, युवा अध्यक्ष समद बोंबले,अमित साहू, संदेश म्हात्रे, दिनेश पाटील, महिला पदाधिकारी शोभा चौगुले, देवकी शिंदे, साधना वाणी, केदारे मॅडम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी शिंदेच्या कुटुंबीयांची भेट घेउन त्यांचे सांत्वन केले. उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपील कठोर शिक्षा देण्याची मागणी रुपाली चाकणकर व प्रशासनाकडे केली आहे.

यानंतर रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, आरोपीला जात-पात धर्म पक्ष काहीही नसतो. ती एक विकृती आहे. कोणीही जातीपातीचे राजकारण करू नये. दिवसेंदिवस समाजात अशा विकृती वाढत चालल्या असून अशा विकृतीचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. समाजात वाईट कृत्य, वाईट गोष्टी घडू नये यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. राज्यात महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस प्रशासन त्याचे काम योग्यरीत्या करीत आहेत. यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल यासाठी मी जातीने लक्ष घालेन.

दरम्यान, 2018-19 पूर्वी यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्री देखील होती. उरणमध्ये यशश्री ज्याठिकाणी राहायची त्याच ठिकाणी दाऊद सुध्दा राहात होता. पण 2019 मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली आणि त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणी त्याला तुरूंगात जावे लागले होते, तुरुंगातून सुटल्यावर तो कर्नाटकला गेला. त्यानंतर दाऊद पुन्हा उरणमध्ये आला. उरणमध्ये आल्यावर त्याने यशश्रीसोबत फोनवरून संपर्क केला आणि यावेळी दोघांनी भेटायचं ठरवलं. या भेटीत यशश्रीने लग्नाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या दाऊदने तिची हत्या केली.

Web Title: Yashashree shinde case we will try to punish murder of yashashree shinde rupali chakankar gave assurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • rupali chakankar

संबंधित बातम्या

पुणे हादरलं! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
1

पुणे हादरलं! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai News: रुपाली चाकणकरांचा प्रताप, पिडीत मुलींची ओळख उघड केली…; रोहित पवारांचा गंभीर आरोप
2

Mumbai News: रुपाली चाकणकरांचा प्रताप, पिडीत मुलींची ओळख उघड केली…; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार? रुपाली चाकणकरांनी केले ‘हे’ गंभीर आरोप
3

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार? रुपाली चाकणकरांनी केले ‘हे’ गंभीर आरोप

Rohini Khadse : प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाची उडी; रोहिणी खडसे यांनी थेट मुद्दे मांडून घेतला खरपूस समाचार
4

Rohini Khadse : प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाची उडी; रोहिणी खडसे यांनी थेट मुद्दे मांडून घेतला खरपूस समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.