फोटो सौजन्य - Adv. Yashomati Thakur X अकाउंट
यशोमती ठाकूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रामधील प्रत्येक महिलेला १५०० रुपये प्रत्येक महिन्यात देणार आहेत. त्यानंतर नागरिकांची मागणी होती की लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी आहे तर मग पुरुषांसाठी का कोणती योजना नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. या योजनेत त्यांनी सहा, आठ आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचे जाहीर केले आहे. या योजनेला आता यशोमती ठाकूर यांनी विरोध केला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलेला १५०० रुपये देण्यात येणार आहेत तर लाडका भाऊ योजनेमध्ये १२ वी पास तरुणांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला ८ हजार तर पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिना मिळणार आहेत. लाडक्या भावाला सहा, आठ आणि बारा हजार देताय तर लाडक्या बहीणीला पंधराशे का? महिलांची किंमत एवढी कमी आहे का? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या या मागणीचा विचार लक्षात घेऊन सरकार लाडकी बहीण योजनेचे रुपयांचे मीटर वाढवणार की तेव्हढेच ठेवणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शिकलेल्या महिलांना पैसे का देत नाहीत? फक्त मतदानासाठी तुम्ही करत आहात का? लाडक्या बहीणीला देखील ५ हजारांच्यावर पैसे देण्यात यावेत अशी माझी मागणी आहे.
राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून पंधराशे रुपयात महिलांची बोळवण राज्य सरकारने केली आहे, तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मान जनक रक्कम द्यावी अशी माझी मागणी आहे.
राज्य… pic.twitter.com/dWgZOG6Ztx— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 18, 2024
१२ वी उत्तीर्ण – दरमहा ६ हजार रुपये
डिप्लोमा झालेला तरुण – दरमहा १० हजार रुपये
पदवीधर तरुण – दरमहा १० हजार रुपये
या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
या तरुणांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे
शैक्षणिक पात्रतेचे १२ वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे ३ गट आहेत
शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल
अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी