
Yavatmal News: वाहकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित कोलमडले, ३७३० पदे रिक्त; फेऱ्यांवर परिणाम
मात्र, बसस्थानकात सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न होत असताना राज्यात रिक्त असलेल्या वाहक पदांच्या भरतीबाबत फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. राज्यात वाहकांची ३ हजार ७३० पदे रिक्त असल्याने आगार व्यवस्थापक, प्रमुखांना दैनंदिन फेऱ्यांचे नियोजन करणे कठीण होते. अशात वाहकांना डबल ड्युटी द्यावी लागत असल्याने फेऱ्या उशिराने धावतात, तर कधी कधी त्या रद्दही होतात. त्याचा परिणाम, एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. यामुळे प्रवाशांनाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यरत वाहकांवरही अनेकदा डबल ड्युटीचा ताण येत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महामंडळातील वाहकांकडूनच वाहकांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यवतमाळ जिल्ह्यात एसटी महामंडळासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. वाहक आणि चालकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. एसटी महामंडळात ३,७३० पदे अद्याप रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. याचा परिणाम एसटी बस फेऱ्यांवर होत आहे. त्यामुळे प्रवशांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द किंवा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने प्रवाशांचे दैनंदिन कामकाज खोळंबत असून विद्यार्थ्यांसह नोकरी करणाऱ्यांची गैरसोय वाढली आहे. ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मोठी बातमी ! विमानतळावरून 785 कोटींचे सोने जप्त; DRI कडून आकडेवारी जाहीर
एसटी महामंडळात वाहकांची पदे रिक्त असल्याने अनेक आगारांत कार्यरत असलेल्या वाहकांना दुहेरी कर्तव्य (डबल ड्युटी) बजावावे लागते. एक कामगिरी पार पाडल्यानंतर लगेच दुसऱ्या कामगिरीवर चढणे, त्यांना शक्य होत नाही. परिणामी, नियोजित फेऱ्यांना बराच विलंब होतो आणि त्याचा फटका प्रवाशांना बसतो.