Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो आवाज माझ्या बहिणीचा आणि दुसरा…’; बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांची धक्कादायक प्रतिक्रिया

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवार यांनीही यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 20, 2024 | 01:53 PM
'तो आवाज माझ्या बहिणीचा आणि…'; बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांची धक्कादायक प्रतिक्रिया

'तो आवाज माझ्या बहिणीचा आणि…'; बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांची धक्कादायक प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी हे गंभीर आरोप लावले आहेत. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले होते, त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असतानाच अजित पवार यांनीही यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणुकीसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येतायेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये काम केलं होतं. आता ते विरोधात आहेत. तसेच मधल्या काळात ते भाजपाचे खासदारही होते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

#WATCH | On allegations against Supriya Sule and Nana Patole, Maharashtra Deputy CM and NCP candidate from Baramati Assembly constituency, Ajit Pawar says “Whatever audio clip is being shown, I just know that I have worked with both of them. One of them is my sister and the other… pic.twitter.com/wgoEJrAFya

— ANI (@ANI) November 20, 2024

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. यामध्ये कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर करण्यात आले. ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळेंचा आवाज असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान आज बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बिटकॉईनसंदर्भात आरोप करण्यात आले आहे याची माहिती काल संध्याकाळी माध्यमांमधून समजली. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. त्यांना काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे, असं सांगितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा. त्यानंतर काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सुधांशु त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात मानहानीचा दावा केल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. आज सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिलं की बाहेर येऊन उत्तर द्यावं. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. सुधांशु त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनलवर, ज्या वेळी मला बोलवतील, त्या वेळी मी जाऊन उत्तर देईन, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

Web Title: Yes this is my sister sound ajit pawar reaction after bitcoin scam allegations on mp supriya sule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 01:52 PM

Topics:  

  • ajit pawar news
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस; सिटी सर्व्हे रद्द होणार?
1

पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस; सिटी सर्व्हे रद्द होणार?

स्थानिक निवडणुकीमुळे जनसंपर्कावर भर; इच्छुकांकडून आपआपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू
2

स्थानिक निवडणुकीमुळे जनसंपर्कावर भर; इच्छुकांकडून आपआपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू

शाळेची पहिली घंटा वाजली; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
3

शाळेची पहिली घंटा वाजली; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले; माळेगाव कारखान्याचा…
4

उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले; माळेगाव कारखान्याचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.