Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Popular Movies And Web Series of 2024: सर्वाधिक लोकप्रिय भारतीय १० चित्रपट आणि वेबसीरीजची यादी जाहीर; नंबर १ वर कोणती कलाकृती

IMDb ने २०२४ चे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट आणि वेबसीरीजची यादी जाहीर केली आहे. ही यादी प्रेक्षकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 11, 2024 | 06:10 PM
सर्वाधिक लोकप्रिय भारतीय १० चित्रपट आणि वेबसीरीजची यादी जाहीर; नंबर १ वर कोणती कलाकृती

सर्वाधिक लोकप्रिय भारतीय १० चित्रपट आणि वेबसीरीजची यादी जाहीर; नंबर १ वर कोणती कलाकृती

Follow Us
Close
Follow Us:

IMDb (www.imdb.com), ह्या मूव्हीज, टीव्ही शोज व सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत लोकप्रिय व विश्वसनीय स्रोताने 2024 मध्ये जगभरातील IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 10 भारतीय मूव्हीज व 10 वेब सिरीजची यादी घोषित केली आहे. IMDb च्या वर्षाच्या शेवटी येणा-या यादीचे निर्धारण जगभरामध्ये दर महिन्याला काय बघावे हे शोधण्यासाठी IMDb वर येणा-या 25 कोटींहून अधिक दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार केले जाते.

“IMDb च्या 2024 च्या सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपट व वेब सिरीजची यादी केवळ वर्षातील आघाडीच्या टायटल्सना सेलिब्रेट करते इतकेच नाही‌ तर दर्शक कशाला प्राधान्य देतात, ह्याबद्दलसुद्धा म्हत्त्वाची माहिती देते. त्यामुळे ती निर्माते व चाहते दोघांनाही मनोरंजनासंदर्भात अनेक पर्याय उपलब्ध करून देते,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “क्र. 1 चा चित्रपट कल्की 2898-एडी ह्या अतिशय बिग बजेट कलाकृतीपासून ते क्र. 10 वरील लापता लेडीज ह्या थरारक नाट्यापर्यंत व लोकांना आवडणा-या फ्रँचायजीच्या पुनरागमनापासून विलक्षण अशा ओरिजिनल मालिकांपर्यंत ह्या याद्यांमध्ये जगभरातील श्रोत्यांना खिळवून ठेवणा-या भारतातील कथा मांडणीची अविश्वसनीय व्याप्ती समोर आली आहे.”

ठाण्यात रंगणार ९०च्या दशकातील गाण्यांची मैफल, वैशाली माडे आणि साधना सरगमच्या गाण्यांची रंगणार खास सायंकाळ

‘कल्की 2898-एडी’ ह्या 2024 च्या क्र. 1 स्थानावरील चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन ह्यांनी म्हंटले, “IMDb च्या 2024 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये कल्की 2898-एडी पहिल्या स्थानी आल्याचे बघताना अतिशय आनंद होतो आहे. ही मान्यता आपल्या चित्रपटाला खुल्या हृदयाने आपलेसे करणा-या विलक्षण अशा दर्शकांच्या प्रेम आणि पाठिंब्याचे प्रतिक आहे. ह्या चित्रपटामध्ये आम्ही आमचे सर्वस्व झोकून दिले होते व जगामधील सर्व वयोगटातील चाहत्यांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटलेले बघताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. IMDb आणि हा प्रवास इतका रोमांचक करणा-या सर्व चाहत्यांना मन:पूर्वक धन्यवाद! तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्हांला गोष्ट सांगण्याच्या आमच्या मर्यादांच्या पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.”

‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ ह्या क्र. 1 स्थानावरील वेब सिरीजच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्स इंडियाच्या सिरीज हेड तान्या बामी ह्यांनी म्हंटले, “नेटफ्लिक्सला नेहमीच जगभरामध्ये अभिनव मालिका आणल्याबद्दल ओळखले जाते व आमच्या भारतीय मालिकेला ती मान्यता मिळता बघणे अतिशय आनंददायक आहे. हीरामंडी: द डायमंड बाजार ही आमची आजवरची सर्वाधिक महत्त्वाकांक्षी ड्रामा मालिका होती व ती एक उल्लेखनीय सांस्कृतिक मापदंड ठरली. मामला लीगल है (क्र. 6 चे स्थान) एक वेगळी लोकप्रिय कृती ठरली व त्यामध्ये कोर्टातील नाट्यासह आनंदित करणारा विनोद ह्यांचे कौशल्याने मिश्रण केले गेले होते. द ग्रेट इंडियन कपिल शो (क्र. 10 चे स्थान) मालिकेने वीकएंड मनोरंजनाची व्याख्या नव्याने निश्चित केली. ह्या तीन वैशिष्ट्यपूर्ण मालिकांचा IMDb च्या टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सिरीजच्या यादीमध्ये समावेश होण्यावरून आपल्या भारतीयांच्या रसिकतेमधील वैविध्य व गुणवत्तेची कल्पना येते व आपल्या कंटेंट धोरणामध्ये मोठ्या प्रकारातील गोष्ट सांगण्याचे महत्त्व अधोरेखित होते. आम्ही आणखी उत्साहाने 2025 मध्ये काम करणार आहोत व भारत व जगभरातील श्रोत्यांसाठी अधिक अविश्वसनीय कहाण्या आणण्यासाठी सज्ज आहोत.”

‘पुष्पा 2’ वर कमेंट केल्यानंतर सिद्धार्थ अडकला अडचणीत, मिका सिंगने घेतला बदला दिले प्रत्युत्तर!

शिलांगी मुखर्जी, दिग्दर्शक व प्रमुख एसव्हीओडी, प्राईम व्हिडिओ, इंडिया ह्यांनी म्हंटले, “2024 हे आमच्यासाठी एक उल्लेखनीय वर्ष होते, कारण आम्ही केवळ नवीन मालिका सुरू केल्या नाहीत तर आमच्या काही अतिशय सफल ठरलेल्या फ्रँचायजी परतही नव्या सीजनमध्ये आणल्या. 2024 च्या सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सिरीजच्या IMDb यादीमध्ये टॉप 5 मध्ये आमच्या तीन मालिका असणे, ही ग्राहकांच्या प्रेमाची पावती आहे. ग्राहकांकडून आणि जगभरातील IMDb युजर्सकडून आमच्या मिर्झापूर (क्र. 2 चे स्थान) आणि पंचायत (क्र. 3 चे स्थान) ह्या लोकप्रिय मालिकांच्या पुनरागमनाबद्दल तसेच सिटाडेल च्या जगात जन्मलेली भारतीय सिरीज असलेल्या सिटाडेल: हनी बनी मालिकेला मिळालेल्या प्रेमासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. 2025 मध्ये पुढे जात असताना आम्ही भारत व जगभरातून अधिक रोमहर्षक सिरीज व चित्रपटांचे कंटेंट आणण्याच्या आमच्या वाटचालीबद्दल अतिशय उत्साहित आहोत!”

KBC 16मध्ये नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चनसोबतच्या हृदयस्पर्शी आठवणी केल्या शेअर

2024 च्या IMDb टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपटांची यादी
1. कल्की 2898-एडी
2. स्त्री 2: सरकटे का आतंक
3. महाराजा
4. शैतान
5. फायटर
6. मंजुमेल बॉयज
7. भूल भुलैया 3
8. किल
9. सिंघम अगेन
10. लापता लेडीज

भारतामध्ये 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर 2024 ह्या कालावधीमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी ज्या चित्रपटांमध्ये सरासरी IMDb युजर रेटिंग 5 किंवा त्याहून अधिक असेल अशा चित्रपटांमधून ही 10 टायटल्स सातत्याने IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होती व हे जगभरातील 25 कोटींहून अधिक IMDb विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार निर्धारित झाले आहे. IMDb युजर्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये ही व इतर टायटल्स इथे जोडू शकतात imdb.com/watchlist व जेव्हा ती स्ट्रीमिंग सेवेवर रिलीज केली जातील तेव्हा सूचना प्राप्त करू शकतात.

2024 च्या IMDb टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सिरीजची यादी
1. हीरामंडी: द डायमंड बाजार
2. मिर्झापूर
3. पंचायत
4. ग्यारह ग्यारह
5. सिटाडेल: हनी बनी
6. मामला लीगल है
7. ताज़ा खबर
8. मर्डर इन माहिम
9. शेखर होम
10. द ग्रेट इंडीयन कपिल शो
भारतामध्ये 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर 2024 ह्या कालावधीमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिरीजपैकी ज्या सिरीजमध्ये सरासरी IMDb युजर रेटिंग 5 किंवा त्याहून अधिक असेल अशा सिरीजमधून ही 10 टायटल्स सातत्याने IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होती व हे जगभरातील 25 कोटींहून अधिक IMDb विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार निर्धारित झाले आहे. IMDb युजर्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये ही व इतर टायटल्स इथे जोडू शकतात imdb.com/watchlist व जेव्हा ती स्ट्रीमिंग सेवेवर रिलीज केली जातील तेव्हा सूचना प्राप्त करू शकतात.

‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’ फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईच्या निधनाने उद्ध्वस्त झाले कुटूंब!

ह्या याद्यांबद्दल आणखी माहिती
• 2024 च्या IMDb च्या सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सात हिंदी टायटल्स आहेत व त्यानंतर तेलुगू (कल्की 2898-एडी), तमिल (महाराजा) आणि मल्यालम (मंजुमेल बॉयज) अशी प्रत्येकी एक टायटल्स आहेत.
• तीन हाय प्रोफाईल सीक्वेल्स—स्त्री 2: सरकटे का आतंक, भूल भुलैया 3, आणि सिंघम अगेन— द्वारे प्रस्थापित फ्रँचायजीसाठी श्रोत्यांची असलेली आवड अधोरेखित होते.
• दीपिका पदुकोनने ह्या यादीमधील तीन चित्रपटांमध्ये प्रमुख भुमिका केली आहे:फायटर, कल्की 2898-एडी आणि सिंघम अगेन. तिला अलीकडेच 2024 च्या IMDb सर्वांत लोकप्रिय भारतीय कलाकार यादीमध्येही क्र. 2 चे स्थान मिळाले आहे.
• लापता लेडीज (क्र. 10) ही पुढील वर्षाच्या सुरूवातीला होणा-या 97 व्या एकेडमिक पुरस्कारांसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म प्रकारामध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका आहे.
• राघव जुयल असा एकमेव कलाकार आहे ज्याच्या किल व ग्यारह ग्यारह मधील भुमिका सर्वांत लोकप्रिय चित्रपट व वेब सिरीज ह्या दोन्ही यादीमध्ये आहेत.
• वेब सिरीज यादीमध्ये पाच सबस्क्रिप्शन असलेल्या सेवांचे प्रतिनिधित्व आहे, नेटफ्लिक्स व पाईम व्हिडिओची प्रत्येकी तीन टायटल्स आहेत व जिओसिनेमाची दोन आहेत तर डिजने+ हॉटस्टार आणि झी5 चे प्रत्येकी एक टायटल आहे.
• द ग्रेट इंडियन कपिल शो ही IMDb च्या वर्षाच्या शेवटी येणा-या यादीमधील नॉन- फिक्शन प्रकारातील पहिली सिरीज आहे.

Web Title: 10 most popular movies and web series of 2024 as per imdb india stree 2 kalki 2898 ad heeramandi the bazaar and mirzapur web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 06:10 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Bollywood News

संबंधित बातम्या

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक
1

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

‘मी खूप मेहनत घेतली’, Dhurandharबद्दल रणवीर सिंगचे वक्तव्य चर्चेत; भूमिकेसाठी घटवलं ‘एवढे’ वजन
2

‘मी खूप मेहनत घेतली’, Dhurandharबद्दल रणवीर सिंगचे वक्तव्य चर्चेत; भूमिकेसाठी घटवलं ‘एवढे’ वजन

रिलीज होऊन 26 दिवस झाले तरी ‘Dhurandhar’ पाहण्यासाठी तरसतोय बॉलिवूडचा ‘हा’ स्टार; जाणून घ्या काय आहे कारण?
3

रिलीज होऊन 26 दिवस झाले तरी ‘Dhurandhar’ पाहण्यासाठी तरसतोय बॉलिवूडचा ‘हा’ स्टार; जाणून घ्या काय आहे कारण?

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट
4

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.