Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा पुन्हा एकत्र; ‘उडता तीर’मधून देशभक्तीचा नवा अंदाज

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा कपूर ‘उडता तीर’साठी पुन्हा एकत्र आले आहेत. सारा अली खानचीही प्रमुख भूमिका असलेला हा देशभक्तीवर आधारित अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 22, 2026 | 02:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ayushmann Khurrana: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर पुन्हा एकदा एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. ‘उडता तीर’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच एकमेकांचा प्रवास पाहिलेल्या या दोघांची विचारसरणीही एकसारखी असल्याचं आयुष्मानने सांगितलं आहे. वेगळ्या धाटणीच्या कथा आणि सिनेमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणण्याची समान आवड या सहकार्यामागे असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

‘कंटेंटच्या बाबतीत आमच्या विचारांचा गाभा सारखाच’

गुनीत मोंगा कपूरसोबत काम करण्याबाबत बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की, दोघांचाही वेगळ्या आणि पारंपरिक चौकटी मोडणाऱ्या कथांकडे कल आहे. गुनीतने आपल्या निर्मितीच्या माध्यमातून वेगळ्या धाटणीच्या कथांना पाठबळ दिलं असून भारतीय कथा जागतिक स्तरावर पोहोचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

याबाबत आयुष्मान म्हणाला, “कंटेंटच्या बाबतीत गुनीत आणि माझ्या विचारांचा गाभा सारखाच आहे. मला नेहमीच पारंपरिक चौकटींपलीकडच्या आणि वेगळेपण जपणाऱ्या सिनेमाने आकर्षित केलं आहे. गुनीतनेही आपल्या पद्धतीने वेगळ्या धाटणीच्या कथांना पाठबळ दिलं आहे. भारतीय कथा जागतिक स्तरावर पोहोचवल्या आहेत आणि ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आमच्या विचारांमधील हेच साम्य या सहकार्याला विशेष बनवतं.”

‘उडता तीर’मध्ये देशभक्ती, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा संगम

‘उडता तीर’ हा देशभक्तीवर आधारित अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटातून पारंपरिक जॉनरच्या चौकटी मोडत मनोरंजनाची वेगळी शैली प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशभक्ती, अ‍ॅक्शन आणि विनोद यांची सांगड घालणारी कथा या चित्रपटाचं वैशिष्ट्य असणार आहे.

चित्रपटाविषयी बोलताना आयुष्मान म्हणाला, “उडता तीरच्या माध्यमातून देशभक्ती, अ‍ॅक्शन आणि कॉमेडी यांची सांगड घालणारा, पारंपरिक जॉनरच्या चौकटी मोडणारा मनोरंजक चित्रपट आम्ही प्रेक्षकांसमोर आणत आहोत. यातून आमची समान विचारसरणीही प्रतिबिंबित होते.”

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल

‘गुनीतने माझं पहिलं ऑडिशन घेतलं होतं’

गुनीत मोंगा कपूर आणि आयुष्मान खुराना यांचं नातं केवळ या चित्रपटापुरतं मर्यादित नाही. त्यांच्या ओळखीचा धागा आयुष्मानच्या करिअरच्या सुरुवातीपर्यंत जातो. गुनीतनेच त्याचं पहिलं ऑडिशन घेतलं होतं, अशी आठवण अभिनेत्याने सांगितली.

या जुन्या नात्याविषयी बोलताना आयुष्मान म्हणाला, “गुनीतने माझं पहिलं ऑडिशन घेतलं होतं, त्यामुळे आमची ओळख खूप जुनी आहे. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि एकमेकांचा प्रवास पाहत आलो आहोत. आता अखेर आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे.”

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’

आयुष्मान खुराना आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत

‘उडता तीर’ या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि सारा अली खान प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आकाश कौशिक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. देशभक्तीच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा अनुभव देणारा हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ayushmann khurrana guneet monga udta teer movie ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Ayushmann Khurrana
  • bollywood movies
  • entertainment

संबंधित बातम्या

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती
1

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’
2

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल
3

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर लॉलीची एन्ट्री; माधुरी दीक्षितने केली भन्नाट नक्कल, व्हिडीओ व्हायरल

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?
4

Tiger Shroff Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रेमाचा अँगल समोर,राधा-कुणालच्या नात्याबाबत तपासात काय समोर आलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.