
फरहान अख्तरच्या 120 Bahadur ची पहिली झलक, दिसणार भारतीय सैन्याच्या भूमिकेत
120 Bahadur Poster : ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात ॲथलिट मिल्का सिंगचं पात्र साकारणारा अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने मोशन पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे. लवकरच फरहान एका रियल लाईफ हिरोच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरचा एक्सेल एंटरटेन्मेंटने ट्रिगर हॅप्पी स्टुडिओजसोबत हात मिळवणी करत ‘१२० बहादूर’ (120 Bahadur) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – ‘आपलं गावच बरं गड्या’, परदेशातून थेट गावात ‘झिम्मा २’ नंतर हेमंत ढोमेचं पुढचं पाऊल
या चतुरस्त्र अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावरून मोशन पोस्टर शेअर करत करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये, फरहान अख्तर पहिल्यांदाच आर्मीच्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये, तो कोणाची भूमिका साकारत आहे, याचा देखील खुलासा करण्यात आला आहे. फरहान चित्रपटात, वीरचक्र पुरस्काराने सन्मानित मेजर शैतान सिंग (PVC) यांचे पात्र साकारणार आहे. अभिनेता पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
फरहानने ‘१२० बहादुर’चं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये चित्रपटाचं कथानक थोडक्यात सांगितलं आहे. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी भारत-चीनमध्ये रेजांग लाचं युद्ध झालं होतं. या युद्धातली भारतीय वीर सैनिकांची अद्वितीय वीरता, साहस आणि निःस्वार्थतेची ही कहाणी आहे. भारतीय सैन्याने ही अद्वितीय कहाणी मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि पाठिंबा दिला, त्यासाठी आम्ही ऋणी आहोत.” रजनीश घई या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.
हे देखील वाचा – रांगडं व्यक्तिमत्व अन् नजरेत दरारा, ‘येक नंबर’ चित्रपटाचा धडाकेबाज पोस्टर रिलीज