Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन,‘3 इडियट्स’मध्ये साकारलेली दुबेंची भूमिका

अभिनेते अखिल मिश्रा यांचं आज निधन झालं आहे.

  • By साधना
Updated On: Sep 21, 2023 | 05:01 PM
akhil mishra

akhil mishra

Follow Us
Follow Us:

थ्री इडियट्स (3 Idiots) या चित्रपटात लायब्ररियन दुबे ही भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra) यांचं आज निधन झालं आहे. बाल्कनीमध्ये काम करत असताना अखिल मिश्रा हे खाली पडले, असं म्हटलं जात आहे. अखिल मिश्रा यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

“तो एक अपघात होता. किचनमध्ये ते जमिनीवर जखमी अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी सुझान बर्नर्ट ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होती.

“माझ्यासाठी ही खूप दु:खद आणि मन हेलावणारी घटना आहे. माझ्या आयुष्याचा भाग मला सोडून गेला आहे,” अशा भावना अखिल मिश्रा यांच्या निधनानंतर सुझाननं व्यक्त केल्या आहेत.

अखिल मिश्रा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अखिल मिश्रा यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. अखिल मिश्रा यांनी ‘डॉन’, ‘गांधी माय फादर’,‘शिखर’, ‘कमला की मौत’, ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘3 इडियट्स’मधील दुबे या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. प्रधान मंत्री या मालिकेत देखील त्यांनी काम केले. ते ‘उतरन’, ‘उडान’, ‘सीआयडी’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘हातिम’ आणि इतर अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांचा भाग होते.

अखिल यांचे पहिले लग्न 1983 मध्ये मंजू मिश्रा यांच्याशी झाले होते. या दोघांनी 1983 मध्ये ‘धत तेरे…की’ या फिचर फिल्ममध्ये आणि ‘गृहलक्ष्मी का जिन’ या मालिकेत काम केले होते. पुढे मग 1997 मध्ये मंजूच्या मृत्यूनंतर, अखिल यांनी फेब्रुवारी 2009 मध्ये जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केले. सुझान बर्नर्टनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कसौटी जिंदगी की’, ‘सावधान इंडिया’, ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.

Web Title: 3 idiots fame actor akhil mishra passed away nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2023 | 04:49 PM

Topics:  

  • 3 idiots
  • entertainment

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
1

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
3

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
4

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.