Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू

Actress Nimmi: ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांच्या निधनानंतर ८ कोटींचे दोन फ्लॅट, १.७७ कोटींची FD आणि दागिन्यांवरून वाद निर्माण झाला आहे. माजी केअरटेकरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 16, 2026 | 03:05 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Actress Nimmi: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी (नवाब बानो) यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या केअरटेकरवर फसवणूक, विश्वासघात आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. केअरटेकरने अभिनेत्रीच्या बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा तसेच मुंबईतील जुहू येथील दोन फ्लॅट्सवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

८ कोटींचे दोन फ्लॅट अन् १.७७ कोटींच्या मुदत ठेवी

निम्मी यांच्या मालमत्तेमध्ये मुंबईतील जुहू तारा रोडवरील नेहा अपार्टमेंटमधील बी-३१ आणि बी-३२ क्रमांकाचे दोन फ्लॅट्स आहेत. हे दोन्ही फ्लॅट्स अभिनेत्रीच्या नावावर नोंदणीकृत होते. त्यांची अंदाजित किंमत ७ ते ८ कोटी रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या मालकीची पार्किंगची जागा, सोन्या-चांदीचे दागिने आणि मारुती सुझुकी सियाझ कारदेखील होती.

विशेष म्हणजे, निम्मी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सारस्वत बँकेतील खात्यांमध्ये जवळपास १.७७ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (FD) होत्या. मात्र, अभिनेत्रीच्या निधनानंतर या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांवरून कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोण आहे आरोपी केअरटेकर?

एफआयआरनुसार, असरार अहमद शेख हा निम्मी आणि त्यांचे पती अली रझा यांच्याकडे अनेक वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करत होता. २००७ मध्ये अली रझा यांचे निधन झाल्यानंतर निम्मी एकट्या पडल्या होत्या. वय आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी केअरटेकरवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत संयुक्त बँक खाती उघडली होती. त्यानंतर तो अभिनेत्रीची बँक खाती आणि आर्थिक व्यवहार सांभाळत होता.

मात्र, कुटुंबीयांच्या आरोपानुसार, असरार अहमद शेख याने या विश्वासाचा गैरफायदा घेतला. अभिनेत्रीच्या बँक खात्यांमधील पैशांचा गैरवापर केल्याचा तसेच त्यांच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

मृत्युपत्रात दत्तक मुलासह कुटुंबीयांना दिली होती मालमत्ता

निम्मी यांनी निधनापूर्वी मृत्युपत्र तयार केले होते. या मृत्युपत्रात त्यांनी गुरपाल सिंग हरबंस सिंग सच्चार यांची कार्यकारी म्हणून नियुक्ती केली होती. तसेच त्यांची मालमत्ता, बँक ठेवी, फ्लॅट्स आणि दागिने दत्तक मुलगा अली सय्यद परवेझ आणि कुटुंबातील इतर सदस्यांना देण्याची तरतूद केली होती.

मात्र, अली सय्यद परवेझ यांचेही डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटनमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सलमा आणि तीन मुले आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, निम्मी यांच्या निधनानंतर केअरटेकरने त्यांच्या मालमत्तेचा आणि बँक ठेवींचा गैरवापर केला. मुदत ठेवींमधील रकमेचा अपहार करण्यात आला, तसेच अभिनेत्रीच्या कारच्या विक्रीतून मिळालेली रक्कमही स्वतःकडे ठेवल्याचा आरोप आहे.

Kishor Kadam: ‘जिजाई’मधील किशोर कदम यांची भूमिका ठरणार खास; दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी सांगितलं कारण

फ्लॅट्स विकून रक्कम वाटण्याचा प्रस्ताव?

तक्रारदार मोहम्मद युनूस सलीम दुर्रानी यांनी ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांनी स्वतःची ओळख निम्मी यांच्या नातेवाईक म्हणून दिली असून, मुखत्यारपत्राच्या आधारे सलमा नेल्डी परवीन यांच्या वतीने ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, केअरटेकरने कुटुंबीयांना अभिनेत्रीच्या मृत्युपत्राबाबत माहिती देणे टाळले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मृत्युपत्रासंबंधी माहिती मिळवण्यासाठी याचिका दाखल केली. मृत्युपत्र समोर आल्यानंतरच अभिनेत्रीच्या मालमत्ता आणि गुंतवणुकीची संपूर्ण माहिती मिळाल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

तसेच, केअरटेकरने जुहू येथील दोन्ही फ्लॅट्स विकून मिळणाऱ्या रकमेत वाटा देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र तक्रारदाराने हा प्रस्ताव नाकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सध्या हे दोन्ही फ्लॅट्स बंद आणि कुलूपबंद असल्याची माहितीही समोर आली आहे.

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?

केअरटेकरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी असरार अहमद शेख याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०४, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांमध्ये मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा अपहार, विश्वासघात, फसवणूक आणि बनावटगिरीसंबंधी आरोपांचा समावेश आहे.

दरम्यान, निम्मी यांच्या मृत्युपत्राशी संबंधित प्रोबेटची कार्यवाही मुंबई उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. पोलिसांकडून बँक खात्यांमधील व्यवहार, मालमत्तेची कागदपत्रे आणि मृत्युपत्राची तपासणी केली जाणार आहे. सध्या हे सर्व आरोप तक्रारीवर आधारित असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यातील सत्यता स्पष्ट होणार आहे.

Web Title: Actress nimmi property dispute 8 crore flats fd care taker fraud case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment

संबंधित बातम्या

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ
1

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?
2

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर गोळीबार करण्याचा कट; दोन शूटर अटकेत, कारण आलं समोर!
3

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर गोळीबार करण्याचा कट; दोन शूटर अटकेत, कारण आलं समोर!

Kishor Kadam: ‘जिजाई’मधील किशोर कदम यांची भूमिका ठरणार खास; दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी सांगितलं कारण
4

Kishor Kadam: ‘जिजाई’मधील किशोर कदम यांची भूमिका ठरणार खास; दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी सांगितलं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.