Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नालासोपाऱ्यातील मराठी विश्वातील आयुष भिडे उगवता तारा, पुन्हा एकदा आयुष भिडे दिसणार नव्या अवतारात

वडील आशिष यांच्या स्मरणार्थ 'कलामंच' या संस्थेची ही त्याने स्थापना केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 07, 2023 | 06:05 PM
नालासोपाऱ्यातील मराठी विश्वातील आयुष भिडे उगवता तारा, पुन्हा एकदा आयुष भिडे दिसणार नव्या अवतारात
Follow Us
Close
Follow Us:

रविंद्र माने-वसई : ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत नील कामतची भूमिका साकारणारा घराघरात स्थान मिळवलेल्या नालासोपारातील उदयोन्मुख कलाकार आयुष भिडे हा ‘प्रेमाची गोष्ट’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या अभिनयाने, विविध भूमिका साकारून आयुषने घराघरात स्थान मिळवलं आहे. नाटक आणि अभिनयाचा वारसा वडिल आशिष भिडे यांच्याकडून लहानपणापासूनच मिळत असल्यामुळे आयुष लवकरच परीपक्व झाला.

वयाच्या १४ व्या वर्षापासून त्याने त्याच्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली. अनेक एकांकिका, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करत त्याने अनेक पारितोषिकं पटकावली. फक्त मराठीच नाही तर हिंदी नाटकासाठी सुद्धा त्याने पारितोषिकं मिळवली. अनेक एकांकिकांचं दिग्दर्शनही त्याने केलं. अनेक कलाकृतींचं डबिंग करून त्याने त्याच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली. इतकंच नव्हे तर ‘द मॅड बॉईज’ आणि ‘सिनेमो स्टुडिओ’ ही दोन युटयुब चॅनेल्स ही त्याने सुरु केली आहेत.

वडील आशिष यांच्या स्मरणार्थ ‘कलामंच’ या संस्थेची ही त्याने स्थापना केली. २०२१ मध्ये स्टार प्रवाह वरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत निराजी रावजी पंत ही भूमिका साकारत त्याने मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत खलनायक नील कामतची भूमिका साकारून त्याने आपली वेगळी छाप निर्माण केली. आजही नील कामत ही भूमिका सगळ्यांच्या मनात कोरली गेली आहे.

‘रंग माझा वेगळा’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘शुभ विवाह’ या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता पुन्हा नव्याने तो स्टार प्रवाहवर ४ तारखेपासून सुरु झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या नवीन मालिकेत ‘लकी’च्या आगळ्या वेगळ्या भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीस आला आहे. वेगवेगळ्या मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका आयुष भिडे याचा, ‘लकी’ ही भूमिका सगळ्यांना नक्कीच आवडेल. या भुमिकेलाही योग्य न्याय देऊन आयुष पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करेल असा विश्वास जेष्ठ रंगकर्मी शांताराम वाळींजकर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Aai kuthe kay karte ayush bhide marathi actor rang maza vegla jai jai swami samarth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2023 | 06:05 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
1

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
2

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
3

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार
4

पहिला चित्रपट अन् पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड; ‘या’ अभिनेत्याला “येक नंबर” चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.