Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

मराठी सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 13, 2025 | 06:43 PM
रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत नाहीत, तर मानवी मनोव्यापाराचा अचूक अभ्यास, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी शैली यांचं प्रभावी मिश्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवतं.

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

त्यांच्या याच बहुआयामी लेखनशैलीला आणि स्मृतीला सलामी देण्यासाठी बदाम राजा प्रॉडक्शन सादर करत आहे – ‘श्श… घाबरायचं नाही.’ या विशेष नाट्यपूर्ण सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या रत्नाकर मतकरी लिखित दोन गूढ कथांचं रंगमंचीय सजीव रूप प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे. या कथा वाचनापुरत्या किंवा केवळ ऐकण्यापुरत्या न राहता, अभिनय, आवाज, प्रकाशयोजना आणि दृश्य सादरीकरणाच्या माध्यमातून एक थेट अनुभव देणाऱ्या रूपात साकारल्या जातील.

काजोल च्या ‘माँ’ चित्रपटाबाबत समोर आले अपडेट, जाणून घ्या ओटीटीवर कधी आणि कुठे होणार रिलीज?

गूढतेचा अनुभव फक्त कथेमधूनच नव्हे, तर रंगमंचावरूनही मिळावा यासाठी विशेष प्रकाशयोजना वापरून एक झपाटून टाकणारं, रहस्यनिर्म वातावरण उभं करण्यात आलं आहे. कथा, अभिवाचन आणि प्रकाशाचा खेळ या सर्व घटकांचा मेळ साधत या कथांना अधिक परिणामकारक आणि अस्वस्थ करणारा स्पर्श दिला जातो. या नाट्यपूर्ण सादरीकरणाचं दिग्दर्शन ज्येष्ठ आणि कसलेल्या दिग्दर्शक विजय केंकरे करत आहेत. केंकरे यांचं दिग्दर्शन म्हणजे तांत्रिक सफाईसोबतच कथेमागील सूक्ष्म भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची एक सर्जनशील प्रक्रिया. त्यांच्या दिग्दर्शनामुळे मतकरींच्या कथा केवळ ऐकण्यापुरत्याच न राहता, अंतर्मनात थेट पोचणाऱ्या दृश्य अनुभवात परिवर्तित होतात.

 

या उपक्रमाच्या निर्मितीमागे आहेत ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ ही नव्या विचारांची, पण संवेदनशील निर्मिती संस्था. जुनं, कालातीत आणि दर्जेदार साहित्य नव्या पिढीसमोर नव्या माध्यमातून सादर करायचा त्यांचा दृष्टिकोन ‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये प्रकर्षाने जाणवतो. हे नाट्य केवळ मनोरंजन न राहता, साहित्य आणि रंगभूमी यांचा विलक्षण संगम घडवणारं सांस्कृतिक सूत्रधार ठरतं. कलाकार मंडळीदेखील यथायोग्य. पुष्कर श्रोत्री – अभिनय, दिग्दर्शन आणि आवाज अशा तीनही पातळ्यांवर ठसा उमटवणारा बहुआयामी कलाकार. डॉ. श्वेता पेंडसे, जी प्रगल्भ अभिनय आणि आवाजातील भावनिक सूक्ष्मता सहजतेने साकारते. आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक, जे रंगभूमीवरच्या त्यांच्याच सहजतेने आजही समोरचं चित्र भारून टाकतात.

लग्न टिकवण्यासाठी शर्मिला टागोर यांनी मुलीला दिलेला मोलाचा सल्ला, सोहा अली खानने सांगितले गुपित…

या सादरीकरणाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे– डॉ. गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे दोघंही पुन्हा एकत्र रंगभूमीवर झळकणार आहेत. त्यांच्या आवाजात, त्यांच्या अस्तित्वात एक वेगळीच रसायनं आहे, जी प्रेक्षकांना त्या गूढ कथांच्या थेट केंद्रबिंदूवर नेतं. दोन्ही कलाकार आपल्या या नव्या कलाकृतीसाठी आणि एका वेगळ्या प्रयोगासाठी फार उत्सुक आहेत. ‘श्श… घाबरायचं नाही’ हे नाट्य सादरीकरण म्हणजे रत्नाकर मतकरी यांच्या शैलीला, विचारांना आणि त्यांच्या कथांच्या प्रभावाला नव्या रंगात साकारण्याचा एक सच्चा प्रयत्न आहे. मतकरींच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी ही आठवणींची शिदोरी ठरेल आणि नव्या पिढीसाठी त्यांच्या लेखनाशी जोडून घेण्याची एक विलक्षण संधी ठरेल. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता ओपेरा हाऊस, मुंबई येथे सादर होणार आहे.

Web Title: Dr girish oak and dr shweta pendse new marathi natak ssshhhhh ghabarayach nahi announced in social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…
1

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर
2

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
3

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 
4

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.