“पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट...
सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेची चांगलीच चर्चा होत आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून ही सीरियल बंद होणार आहे. मुख्य बाब म्हणजे, या मालिकेचा पाच वर्षांचा प्रवास आता संपणार आहे. त्यामुळे आता मालिकेतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंतच्या प्रवासावर लिहिताना पाहायला मिळत आहे. यश म्हणजेच अभिजीतनंतर मालिकेमध्ये विशाखाचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री पुनम चांदोरकरने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. नुकतीच मालिकेची शुटिंग संपली. पॅकअपच्यावेळी निर्मात्यांसह मालिकेच्या संपूर्ण टीमने शेवटचा दिवस सेलिब्रेट केला.
करणवीर सिद्धार्थपेक्षा कसा आहे वेगळा? चाहते का करतायत शुक्लासोबत मेहराची तुलना?
पुनम चांदोरकरने मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करत शेवटच्या दिवशी निर्मात्यांनी दिलेल्या सन्मानचिन्हाचाही तिने फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुनम चांदोरकरने लिहिलंय की, “विशाखा काळजी घे… ५ वर्ष सुरू असलेला हा प्रवास काल पूर्ण झाला. इथून पुढे आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात… जिची कुठेही शाखा नाही अशी “विशाखा” असं गंमतीमध्ये रवी सर, आप्पा (किशोर महाबोले) बोलायचे. “आई कुठे काय करते” काल (२० नोव्हेंबर) शूटिंगचा शेवटचा दिवस होता… रात्री गणपती बाप्पा मोरया असे जेव्हा रवी सर बोलले तेव्हा पहिल्यांदा काहीतरी खोलवर जाणवलं… ही पॅकअपची घाई, हा आवाज, ही वास्तू, स्क्रिप्ट, क्लोज साठी मेकअप टचअप करून रेडी होणं, कॉस्च्युम, तयारी आणि बरंच… बरंच… काही काल समृद्धी बंगल्यात मध्ये थांबलं… आणि मग पहिला दिवस ते आजचा दिवस सगळं डोळ्यासमोरून येऊन गेल्या… या मालिकेने , समृद्धीने कलाकार म्हणून माणूस म्हणून खरच खूप समृद्ध केलं… शेवटचे तिथे मस्तक टेकवलं आणि वास्तूचा निरोप घेतला…”
“आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता वर्तक, मुग्धा गोडबोले यांच्या लेखणीतून विशाखा तयार झाली आणि मग रवी सर, सुबोध सर ,तुषार विचारे यांच्या मार्गदर्शनाने तिने आकार घेतला.. अगदी कुठेही गेलं तरी ‘विशाखा’या नावाने तिला सगळे ओळखतात… लॉकडाऊनमध्ये तर डोळे आणि आवाजावरूनही तोंडावर मास्क असतानाही “विशाखा आत्या “ही हाक आली की समाधानाने भरून पावत होते. या प्रोजेक्टसाठी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी तुमच्या प्रोजेक्ट नमिता वर्तक आमच्या संवाद लेखिका, चित्रा पाटणकर आमचे निर्माते राजन शाही यांचे मनापासून आभार. तसेच स्टार प्रवाह, सतीश राजवाडे सर, आमचे कॅप्टन ऑफ द शिप रवी सर सुबोध बरे, तुषार विचारे, तसेच कधी काही प्रॉब्लेम सांगितला तर लगेच तो सॉल करणारा आमचा हक्काचा रोहित दादा, आमचे डीओपी राजू देसाई, आमचे इपी आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे तसेच सर्व कलाकारांचे मी आभार मानते. ज्यांनी मला या सर्व प्रवासात सांभाळून घेतलं आणि कांगोरे असलेले ‘आई कुठे काय करते’ हे नेहमी मनाच्या कोपऱ्यात आढळ स्थानावर राहिल आणि या सगळ्यात विशाखा या कॅरेक्टरवर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम करत राहा तुमचा आशीर्वाद असू दे. तुमचे मी खूप खूप आभारी आहे.”