"मी वाटच बघत होतो, मला..." मराठी- हिंदी भाषेच्या वादावर अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, "आता माझी..."
मृणाल ठाकूर, सोनाक्षी सिन्हा, अजय देवगण आणि संजय दत्त स्टारर ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असून हा चित्रपट येत्या २५ जुलै २०२५ रोजी देशभरासह परदेशातही रिलीज होणार आहे. चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून चित्रपटातले कलाकार सध्या प्रमोशनमध्ये कमालीचे व्यग्र आहे. संपूर्ण राज्यात सध्या मराठी- हिंदी भाषेचा वाद कमालीचा चर्चेत आहे. मराठी सेलिब्रिटींप्रमाणे आता बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा मराठी- हिंदी भाषेच्या वादावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
प्राजक्ता कोळीने रचला इतिहास! बनली TIME100 Creators मधील पहिली भारतीय डिजिटल क्रिएटर
‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी अजय देवगणला एका पत्रकाराने मराठी- हिंदी भाषेच्या वादावर प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिली. अजय देवगणची प्रतिक्रिया, ‘बझझूका स्क्रोल’ या पापाराझी चॅनलने शेअर केली आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याला प्रश्न विचारला की, “काही कलाकारांनी मराठी- हिंदी भाषेच्या वादावर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तुझं यावर काय मत आहे ?” “मी वाटच बघत होतो कोण मला हा प्रश्न विचारणार आहे याची…”, असा प्रश्न विचारल्यावर सर्वात पहिले अजय देवगणची अशी प्रतिक्रिया होती.
श्री महावतार बाबाजींची महती सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही जाहीर…
पुढे अभिनेता मराठी- हिंदी भाषा वादाबाबत म्हणाला, “सध्या जे सुरू आहे, त्याबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटतं की, आता माझी सटकली…” अजय देवगणचं हे उत्तर ऐकून तेथील उपस्थितांनी हास्यकल्लोळ केला. यावेळी अभिनेत्यासह मंचावर मृणाल ठाकूरही उपस्थित होती. अजय देवगणपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही ‘केडी’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी मराठी- हिंदी भाषा वादाबाबतच प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली की, “मला मराठी माहित आहे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे, पण आज आपण ‘केडी’ चित्रपटाविषयी बोलण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे कुठल्याही वादग्रस्त विषयावर आम्ही बोलणार नाही. आमचा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आम्ही मराठीतही तो प्रदर्शित करू शकतो.”
मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आणखी दोन आव्हान, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेला नवीन ट्रॅक
अजय देवगण, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर, १३ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. चित्रपटामध्ये, अजय देवगण पुन्हा एकदा सरदारजीच्या लूकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगन लग्नासाठी काय-काय धाडस करतोय, याची झलक आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटात अजय देवगण आणि मृणाल ठाकूरसोबत रवि किशन, संजय मिश्रा, दीपक डोबरियाल, चंकी पांडे, कुब्रा सैत, विंदु दारा सिंग, मुकुल देव, शरद सक्सेना, अश्विनी कालसेकर, रोशनी वालिया यांच्यासारखे कलाकार पहायला मिळणार आहे.