Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘१० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार…,’ तापसी पन्नूच्या थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा ‘अस्सी’ मधून गंभीर वास्तव उघड

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच "अस्सी" हा चित्रपट घेऊन येणार आहे, या चित्रपटाबद्दल अभिनेत्रीने आता आपले मत मांडले आहे. तसेच हा थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 04, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • तापसी पन्नूच्या थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा
  • ‘अस्सी’ मधून उलघडणार गंभीर वास्तव
  • “अस्सी” हा चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे?
 

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी “अस्सी” चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलिकडेच, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, तापसीने देशात लैंगिक अत्याचारच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. तिने सांगितले की अशा प्रकरणांमध्ये १० वर्षांचा मुलगा देखील गुन्हेगार ठरतो आहे आणि जर मुलांना दिशाभूल केली गेली तर आपण काहीतरी चुकीचे करत आहोत. या विषयावर चिंता व्यक्त करताना, तापसीने ते बदलण्याची गरज असल्याचे व्यक्त केले आहे.

तापसी मंगळवारी तिच्या आगामी “अस्सी” चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरमध्ये उपस्थित राहिली होती. चित्रपटाशी संबंधित मुद्द्यांवर माध्यमांशी बोलताना तिने समाजातील वाढत्या भयानक घटनांवरही भाष्य केले. जवाहर सर्कलमधील ईपी मिराज सिनेमा येथे माध्यमांशी झालेल्या भेटीदरम्यान, तिने चिंता व्यक्त केली की लोक लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांना सामान्य बातमी समजत आहेत.

Border 2 OTT Release: थिएटरनंतर ओटीटीवरही गाजणार ‘बॉर्डर 2’;कधी आणि कुठे होणार रिलीज? जाणून घ्या

“दररोज सुमारे ८० लैंगिक गुन्ह्यांच्या घटना नोंदवल्या जात आहेत” – तापसी

अभिनेत्रीने लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ आणि बाल शोषणाची सामान्य धारणा समाजात गंभीर समस्या असल्याचे वर्णन केले. ती म्हणाली, “देशात दररोज सुमारे ८० लैंगिक गुन्ह्यांच्या घटना नोंदवल्या जात आहेत.” तिने यावर भर दिला की समाजाने आता या समस्या वैयक्तिकरित्या घेण्याची गरज आहे. भास्करच्या वृत्तानुसार, तापसीने यावर पुढे भाष्य करताना म्हटले आहे की, “मी दिल्लीची आहे. मी दररोज बलात्काराबद्दल खूप काही वाचते. हे अहवाल वाचल्यानंतर, लोक बलात्काराला एक सामान्य गुन्हा मानू लागले आहेत. ते त्याला चोरीसारखे पाहू लागले आहेत. दररोज सुमारे ८० बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत आणि यामुळे मला खूप राग येतो आणि असे वाटते की ते खूप जास्त होत चालले आहे.”

६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

अलीकडेच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या बातमीबद्दल दुःख व्यक्त करताना ती म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मला ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे ऐकायला मिळाले. १० ते १३ वयोगटातील मुलेही यात सामील असल्याचे समोर आले आहे.” अशी घटना दुप्पट धक्कादायक असल्याचे तापसी म्हणाली आहे.

 

“आपण सर्वांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात करायला हवी.” – तापसी

तापसी पुढे म्हणाली, “जर १० वर्षांचा मुलगा बलात्कार प्रकरणात दोषी असेल तर त्यामागील कारण काय असू शकते? मुलांचे संगोपन चुकीच्या पद्धतीने होत आहे. आपण सर्वांनी याकडे लक्ष दिले पाहिजे कारण त्याचा कुठेतरी नकारात्मक परिणाम होत आहे. आपण सर्वांनी घरापासून सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्या घरातील मुलांपासून सुरुवात केली पाहिजे आणि आपल्या मुलांना त्यांची विचारसरणी कशी असावी हे शिकवले पाहिजे. त्यांनी समाजात कसे राहावे जेणेकरून इतर कोणीही असा गुन्हा करू नये.”

कोर्टरूममधील दृश्ये विशेषतः चित्रपटाचा आत्मा

“अस्सी” गंभीर सामाजिक समस्यांना तोंड देणारी कथा आहे. हा केवळ एक मनोरंजक चित्रपट नाही तर तो प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारी कथा सादर करतो.” चित्रपटाच्या आशयाबद्दल बोलताना अभिनेता मनोज पाहवा म्हणाला, “अस्सी हा थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामाचा एक शक्तिशाली मिश्रण असणार आहे. “कथा इतकी मजबूत आणि वेगवान आहे की प्रेक्षकांना क्षणभरही कंटाळा येणार नाही.” प्रत्येक दृश्य एक प्रश्न उपस्थित करते आणि प्रेक्षकांना कथेत गुंतवून ठेवते. विशेषतः कोर्टरूममधील दृश्ये चित्रपटाचे हृदय आहेत, जिथे संवाद आणि भावना दोन्ही खोलवर प्रभाव पाडतात.

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य शूटरची पटली ओळख, पोलिसांचा तपास सुरूच

“अस्सी” हा चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे?

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी “मुल्क,” “थप्पड,” आणि “आर्टिकल १५” सारख्या चित्रपटांमधून सामाजिक मुद्द्यांवर आपले स्पष्ट विचार मांडले आहेत. “अस्सी” मध्ये तो समाज आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू, कानी कुश्रुती, रेवती, कुमुद मिश्रा, झीशान अय्युब, नसीरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक आणि सीमा पाहवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. “अस्सी” २० फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Taapsee pannu on rape cases in the country a 10 year old boy is raping it is our fault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Taapsee Pannu

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.