After Maya two more challenges will face Jagdambe new track for the serieal Aai Tulja Bhavani
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या कथानकात आता एक नवं वळण येणार आहे. मायेचा विनाश होईल की ती देवीला शरण जाईल हे बघणे उत्सुत्केचे असणार आहे. पण, मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आहेत आणखी दोन आव्हानं म्हणजेच दोन षड्रिपू ‘मोह’ आणि ‘क्रोध’. येत्या आठवड्यात या दोन प्रबळ आसुरी शक्तींचं अवतरण थरारक आणि रहस्यमय पद्धतीने मालिकेत होणार आहे.
‘इंद्रायणी’ करणार गुरु माहात्म्य सांगणारे खास कीर्तन, मालिकेत मिळणार भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास
महिषासुराच्या क्रूर यज्ञक्रीयेने आणि दितीच्या सूचनेनुसार आता षड्रिपूंच्या शक्तीला आवाहन करण्यात आलं आहे. पट्टीग्रंथातील मंत्रोच्चार, गूढ प्रकाशयोजना, भीषण ध्वनी आणि वेगवेगळ्या आहुतींच्या माध्यमातून ‘क्रोध’ आणि ‘मोह’ या दोन शक्तींना जागृत केलं जाणार आहे. मालिकेत ‘मोह’ षड्रिपूंचे मोहिनी रूप अभिनेत्री जान्हवी किल्लेकर साकारणार आहे. कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ आणि ‘बिग बॉस मराठी’सारख्या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेली जान्हवी आता ‘आई तुळजाभवानी’मध्ये एक वेगळी, अनोखी भूमिका साकारताना दिसणार आहे. पहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर
“आई तुळजाभवानी” मालिकेत मोहची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली, मालिकेत मी मोहरूपी मोहिनी ही भूमिका साकारणार आहे… मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपचं वेगळी. त्यामुळे ही भूमिका मिळाल्यावर सुरुवातीला मला थोडं दडपण आलं होतं. कारण ही भूमिका केवळ निगेटिव्ह शेडची नाही तर त्यात समोरच्याला मोहित करण्याची लकब आहे. त्यामुळेच ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. कॉस्च्यूम्स खूपच जड आहेत, साडी ज्या विशिष्ट पद्धतीने नेसवली आहे तीदेखील खूप वेगळी आहे, केशभूषा आगळीवेगळी आहे. मायथॉलॉजिकल शो आहे, आणि भाषाही खूपच वेगळी आणि अवघड आहे. या सगळ्यामुळे ही भूमिका साकारणं एक वेगळाच अनुभव आहे. मी पहिल्यांदाच अशी भूमिका करते आहे खात्री आहे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.
हृदयाला भिडेल असा आहे ‘Dhadak 2’ चा ट्रेलर, तृप्ती आणि सिद्धांतच्या जोडीने जिंकले मन
एकीकडे ‘क्रोध’ ही उग्र आणि आक्रमक उर्जा भयंकर लाव्हा रसासोबत अवतरते, तर दुसरीकडे ‘मोह’ एक मोहक, लालित्यपूर्ण आणि नखरेल पण धोका असलेली शक्ती बनून समोर येते. “तुळजा सावध रहा, आम्ही एकाच संकटाची दोन टोकं आहोत! एक जाळतो… एक गुंतवतो पण दोघंही संपवतो!” – असा इशारा देत क्रोध आणि मोह आता देवीसमोर उभे ठाकणार आहेत. त्यातही मोहाचा मोह.. मोहिनीचा पाश..,भुलवून करते कायमचा नाश..म्हणणारी मोहरूपी मोहिनी प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे, कारण जान्हवी किल्लेकर ही अभिनयसंपन्न रूपवती ही भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेत असलेला मोहकपणा आणि आक्रमकपणा, त्याला क्रोधाची मिळालेली साथ हे तुळजासमोर मोठे आव्हान म्हणून उभे राहणार आहे.
गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”
क्रोध आणि मोहच्या येण्याने मालिकेत रंगत, गूढता तिप्पट वाढणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये महिषासुराचे डावपेच, मोह आणि क्रोध यांची ताकद, आणि त्यांच्यासमोर आई तुळजाभवानीच्या बालरूप जगदंबेची सज्जता हे सर्व रंगतदार पैलू प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत. जगदंबा यांना कशी सामोरी जाणार ? कसे त्यांचे वार परतवून लावणार, हे जाणून घेण्यासाठी बघत राहा ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!