अभिजित सावंतचं पहिलंवहिलं गुजराती गाणं
इंडियन आयडॉल ते आज गायन विश्वात 20 वर्ष पूर्ण करत असताना गायक अभिजीत सावंत अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग करताना दिसतोय. इंडियन आयडॉलपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिजीत सावंत आता गुजराती गाण्याचा माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. नवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीतने गायलेले पहिलंवहिलं गुजराती मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रेमरंग सनेडो असं या गाण्याचं नाव असून आता गुजराती प्रेक्षकांनादेखील अभिजीतच्या आवाजाची जादू अनुभवयाला मिळणार आहे.
खास आहे गाणं
या नव्या गाण्याबद्दल बोलताना अभिजीतने सांगितलं की, “एखादं छान गुजराती फेस्टिवल गाणं करण्याची माझी आधीपासून इच्छा होती. प्रेमरंग सनेडोसारखं गरब्याच गाणं करताना एक छान अनुभव मिळाला आणि सोबतीला नव्या भाषेत प्रयोग करण्याची संधी मिळाली. गुजराती गाण्याला थोडा आपला मराठमोळा ठसका देऊन या गाण्याची रचना केली असून दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती एकत्र घेऊन हे गाणं शब्दबद्ध करण्यात वेगळीच गंमत होती आणि ती या निमित्ताने अनुभवली” अभिजीत ने आजवर अनेक सदाबहार गाण्यानी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आता तो गुजराती प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Bigg Boss 19 : बिग बाॅसच्या घरातून कोणाचा होणार पत्ता कट? कोण आहे सर्वात कमकुवत स्पर्धक…वाचा सविस्तर
अभिजितचा वेगळा बाज
अभिजीतने आतापर्यंत हिंदी आणि मराठी अनेक गाणी गायली आहे. त्याच्या आवाजाची जादू नेहमी रोमँटिक गाण्यात अनुभवता येते. आजही त्याचा आवाज तसाच आहे आणि आता गुजराती प्रेक्षकांसाठीही अभिजितचं गाणंं पर्वणी ठरणार आहे. अभिजितचा नेहमी रोमँटिक गाण्याचा बाज असला तरीही त्याने तितक्याच प्रेमाने आणि आनंदाने हे गाणं आपल्या चाहत्यांसाठी गायले आहे.
अभिजीत सावंतसह हे गाणं गायिका सोनाली सोनावणेने गायले आहे आणि या गाण्यात प्रसिद्ध कोरिओग्राफर, अभिनेता रूपेश बने, प्राची, प्रियेश चव्हाणने काम केले असून यांच्यावर हे गाणे प्रकाशित करण्यात आले आहे.
अभिजितच्या गाण्याचा BTS
‘या’ कारणामुळे Ameesha Patel चे झाले नाही लग्न, ‘अर्ध्या वयाची मुलं आता मला…’ व्यक्त केली खंत
अभिजीतची गाणी
अभिजीतने आतापर्यंत गायलेली सर्व गाणी ही तुफान चालली आहेत. ज्यामध्ये ‘मोहब्बते लुटाऊंगा’, ‘लफ्जो में कह ना सकू’, ‘सर सुखाची श्रावणी’, ‘मर जावा मिट जावा’ अशा गाण्यांचा समावेश आहे आणि नुकतेच त्याने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेसाठीही टायटल ट्रॅक गायले आहे. अभिजीतच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानादेखील दिसून येत आहे. आता नवरात्रीसाठी एका नव्या चांगल्या गाण्याची भर पडली आहे असं म्हणायला हरकत नाही.