Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गायकांना मोफत गाण्यास भाग पाडतात..’, अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर आता अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

देशातील पहिले "इंडियन आयडल" अभिजीत सावंतने आता चित्रपट गायकांच्या कामाबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल खुलासा केला आहे. अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर अभिजीतचे हे विधान आता चर्चेत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 05, 2026 | 01:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • इंडस्ट्रीबाबत अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा
  • अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर अभिजीतचे विधान चर्चेत
  • “इंडियन आयडल” विजेता नक्की म्हणाला काय?
 

अरिजीत सिंग यांनी पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केल्यापासून, चित्रपटसृष्टीत गायकांच्या मानधनाबद्दल एक नवीन वाद सुरू झाला आहे. आता, देशातील पहिले “इंडियन आयडल” अभिजीत सावंत यांनीही चिंता व्यक्त केली आहे आणि काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी सांगितले की, इंडस्ट्रीतील गायकांवर अनेकदा मोफत गाण्यासाठी दबाव आणला जातो. गायकाने एखाद्यावर विश्वास असणे किती महत्वाचे आहे याबद्दल देखील सांगितले आहे, ज्याबद्दल अनेक गायकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे. अभिजीत यांनी असेही म्हटले की गायक उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे पैसेही कमवत नाहीत.

इंडियन आयडल सीझन १ चा पहिला विजेता अभिजीत सावंतने पेंटराइज स्टुडिओशी संवाद साधला. गायकाला चित्रपटांमध्ये गाण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल विचारले असता, त्याने कोणताही संकोच न करताना सांगितले, “लोकांना गायकाचे चित्रपटापेक्षा मोठे नाव व्हावे असे वाटत नाही, म्हणून त्यांना एक निश्चित रक्कम दिली जाते. संगीतकारांना अजूनही चित्रपटांमध्ये त्यांच्या संगीतासाठी रॉयल्टी मिळत नाही.” असे तो म्हणाला आहे.

“मी आता प्रेमात…”, अखेर Talwiinder ने दिली प्रेमाची कबुली; दिशा पटानीसोबतच्या डेटिंग वर स्पष्ट बोलला गायक

अभिजीत सावंत पुढे म्हणाला, ” ‘लफझों में कह ना सकून’ या गाण्यावर काम करणाऱ्या बिड्डूप्रमाणेच त्यानेही पाश्चिमात्य देशांमध्ये काही गाणी गायली आहेत आणि त्या दोन गाण्यांमधून त्याला जगण्यासाठी पुरेशी रॉयल्टी मिळावी आहे. गायकाला कधी त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठीही पुरेसे पैसे मिळत नाहीत.”

चित्रपटांपेक्षा स्टेज शोमधून जास्त कमाई मिळते असे अभिजीत सावंतचे म्हणणे आहे. याबद्दल बोलताना गायक पुढे म्हणाला, “इंडस्ट्रीने ही व्यवस्था निर्माण केली आहे. गायक स्वतः संधींसाठी लोभी असतात आणि त्यांना माहित आहे की जर त्यांच्या आवाजात एखादे गाणे रिलीज झाले आणि एखादा मोठा स्टार त्याच्या ओठांवर मॅच झाला ते आयुष्यभर गाणं वाजणार आहे. कधीकधी, गायकाला स्वतःहूनच पैसे नको असतात कारण त्यांना फक्त गाणे किंवा एखाद्या विशिष्ट निर्मात्यासोबत काम करायची इच्छा असते. यासाठी आम्हाला जे काही पैसे मिळतात ते आम्ही स्वीकारतो, कारण जर आम्ही तसे केले नाही तर दुसरे कोणीतरी ते गाणे करेल.” असे अभिजीत बोलताना दिसला आहे.

Dhurandhar: The Revenge ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुस्साट! चित्रपटाने रिलीजआधीच स्वतःचाच मोडला रेकॉर्ड

अरिजीत सिंगने अचानक निवृत्तीचा घेतला निर्णय

गायकांच्या मानधनावरील वादाला अलीकडेच वेग आला जेव्हा २७ जानेवारी रोजी अरिजीत सिंगने अचानक सोशल मीडियावर पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, “नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांपासून चाहत्यांनी मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी आता पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारणार नाही. मी ती संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.” असे लिहून अरिजीतने अनेक चाहत्यांना नाराज केले.

Web Title: Abhijeet sawant claims bollywood singers forced to work for free amid arijit singh retirement from playback singing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.