Abhijeet Sawant Revealed That While He Was On The App He Did Have A Few Conversations
‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनपासून प्रकाशझोतात आलेल्या गायक अभिजित सावंतने एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकतंच अभिजित सावंतने एक मुलाखत दिली आहे. त्याने हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गायकाने खुलासा केलाय की, त्याने लग्नानंतर टिंडर हे डेटिंग ॲप वापरत होता. लग्नानंतर मी त्या ॲपवर दोन ते तीन मुलींसोबत चॅटिंग केली होता, असा खुलासा गायकाने मुलाखतीमध्ये केला. याशिवाय गायकाने आणखी काय खुलासा केला, जाणून घेऊया…
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गायक अभिजीत सावंत म्हणाला की, “मला प्रत्येक गोष्टींमध्ये फार उत्सुकता असते. मी माझ्या मित्रांसोबत अमेरिकेमध्ये होतो. त्यावेळी मला माझ्या मित्राने टिंडर ह्या डेटिंग ॲपबद्दल सांगितलं. त्याने सांगितल्यानंतर मी त्या ॲपवर माझा प्रोफाईलही क्रिएट केला. पण मी तो ॲप जास्त काही वापरत नव्हतो. केव्हातरी मी त्या ॲपवर जायचो. तिथे कशापद्धतीने गोष्टी घडताय, ते पाहायचो. मी त्या ॲपवर माझ्यानावानेच माझं प्रोफाईल तयार केलं होतं. मी टिंडर ॲप वापरतोय, हे माझ्या पत्नीला माहित नव्हतं.”
मुलाखतीदरम्यान अभिजित सावंतने पुढे सांगितले की, “जरीही मी डेटिंग ॲपवर माझ्या नावाने अकाऊंट क्रिएट केलं असलं तरीही मी कोणाला कधी भेटलो नाही किंवा कोणाला डेट केलं. जर कोणत्या प्रोफाईलसोबत माझं प्रोफाईल मॅच झालं तरंच मी बोलायचो. मला लोकांसोबत बोलायला फार आवडतं. मुलींसोबत आपण कोणत्याही विषयावर गप्पा मारु शकता. माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये दोन- तीन जणं असे फ्रेंड्स होते की, ते जे माझ्यासोबत खूप चांगले बोलायचे. ट्वीटरवरही आलं होतं की टिंडर वापरतो. पण माझ्या पत्नीला माहिती नव्हतं की, मी टिंडर ॲप वापरतो. जर तिला कळालं तर ते चांगलं वाटणार नाही.” असं म्हणत अभिजित सावंतने हा धक्कादायक खुलासा केला आहे. शिवाय त्याने मुलाखतीत, मी तो ॲप उत्सुकता म्हणून वापरायचो. असाही खुलासा केला.
अभिजीत सावंत आणि शिल्पाने २००७ साली लव्ह मॅरेज केलं. त्यांना दोन मुली आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अभिजीत सावंत स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता, त्यावेळी त्याची पत्नी आणि दोन्हीही मुली त्याला पाठिंबा देताना दिसल्या होत्या. अभिजीतने अनेकदा त्याच्या पत्नीचे कौतुक केले आहेय. तिच्याविषयी प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. अभिजीत सावंत सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे दिसतो. त्याच्या कॉन्सर्टलादेखील प्रेक्षकांची गर्दी असते. अभिजीत सावंतचा मोठा चाहतावर्ग आहे.