Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अबीर गुलाल’बंद होणार, मालिकेतल्या अभिनेत्रीचं चाहत्यांना भावूक पत्र; म्हणाली, “हाय अंबाबाईची साथ, तर…”

काही महिन्यांपूर्वी 'कलर्स मराठी'वर टेलिकास्ट झालेली 'अबीर गुलाल'ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 23, 2024 | 06:16 PM
'अबीर गुलाल'बंद होणार, मालिकेतल्या अभिनेत्रीचं चाहत्यांना भावूक पत्र; म्हणाली, "हाय अंबाबाईची साथ, तर..."

'अबीर गुलाल'बंद होणार, मालिकेतल्या अभिनेत्रीचं चाहत्यांना भावूक पत्र; म्हणाली, "हाय अंबाबाईची साथ, तर..."

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठी या वाहिनीवर सध्या अनेक नवनव्या मालिकांचा धमाका पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’वर टेलिकास्ट झालेली ‘अबीर गुलाल’ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सहा महिन्यांपूर्वी टेलिकास्ट झालेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. मालिकेमध्ये लाडक्या शुभ्राचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री पायलने प्रेक्षकांना पत्र लिहिले आहे. पोस्टमध्ये पायलने पत्रासोबत मालिकेतील कलाकारांबरोबरचाही फोटो शेअर केला आहे. तिच्या या पत्राचीच सध्या चर्चा रंगली आहे. तिने पत्रात काय लिहिलं आहे? जाणून घेऊया…

फॅशन दुनियेत राज्य करते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता; सोशल मीडियावर फोटो चर्चेत!

 

शेअर केलेल्या पत्रामध्ये पायलने लिहिलंय की,

“तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना, सप्रेम नमस्कार. पत्रास कारण की, तुमची लाडकी श्री तुमचा निरोप घेत आहे. आपण अबीर गुलाल मालिकेला आणि सर्व पात्रांना भरभरून प्रेम दिलं. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल कलर्स मराठीचे आणि फोर लायन्स, फिल्म फार्म या निर्मिती संस्थांचे आभार. सातत्याने अथक मेहनत करून रोज नवीन भाग आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचे आभार. साकारलेली प्रत्येक भूमिका ही आपल्याला काहीना काही देऊन जाते. बहुतांशी मालिकेत सत्याचा असत्यावर विजय होतो. मात्र, त्या पलीकडे जाऊन श्री ने आपल्या न्यूनगंडाला थेट फाट्यावर मारायला शिकवलं. आपली माणसं जपण्यासाठी ४ पावलं मागे येणारी, प्रसंगी ठामपणे उभी राहिलेली श्री तुम्हाला आवडली याचा मला फार आनंद आहे. मराठी मालिकांवर, कलाकृतींवर आपण भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे. परत भेटूच. तोपर्यंत थांबायचं नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची “हाय अंबाबाईची साथ, तर कशाला उद्याची बात” तुमची लाडकी श्री म्हणजेच पायल…”

शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- “ती मला खूप समजून घेते…”

मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री गायत्री दातार आणि पायल जाधवही आहे. अगदी पाच ते सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका फार कमी दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज आहेत. फार कमी दिवसांत मालिका बंद होणं हा धक्का चाहत्यांप्रमाणे कलाकारांनाही बसला आहे. ही मालिका इतक्या लवकर बंद होण्यामागील कारण म्हणजे टीआरपी सुद्धा आहे. अपुऱ्या टीआरपीमुळे जरीही मालिका बंद होत असली तरीही प्रेक्षकांमध्ये चॅनलविरोधात तीव्र नाराजी आहे.

Web Title: Abir gulal serial fame actress payal jadhav shared emotional post on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • indian television show
  • marathi actress

संबंधित बातम्या

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
1

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
2

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय;  रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….
3

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….

किलर गर्लच्या सौंदर्याने केले Kill! हृदयाच्या किल्ल्याचा किल्लेदार ‘जान्हवी किल्लेकर’
4

किलर गर्लच्या सौंदर्याने केले Kill! हृदयाच्या किल्ल्याचा किल्लेदार ‘जान्हवी किल्लेकर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.