"हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट", फुले सिनेमाच्या प्रदर्शनाच्या स्थगितीवरुन किरण मानेंची घणाघाती पोस्ट...
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा स्टारर ‘फुले’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटावरून काही वाद सुरु झाला आहे. चित्रपटाच्या रीलिजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ११ एप्रिलऐवजी हा चित्रपट २५ एप्रिलला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे, चित्रपटाबाबत निर्माण झालेला राजकीय वाद… चित्रपटाचे प्रदर्शन आता दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आले आहे. चित्रपटावरून सध्या वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना अभिनेते किरण माने यांची लक्षवेधी पोस्ट व्हायरल होत आहे.
“मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे”, ‘त्या’ घटनेवर अभिनेत्री अलका कुबल कडाडल्या…
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “…मित्रांनो, का माहिती नाही, पण ‘फुले’ सिनेमाबद्दल माझ्या मनात संशय आहे. ही मनूवादी जमात महाकारस्थानी आहे भावांनो. त्यांनीच ‘स्पॉन्सर्ड’ केलेल्या दिग्दर्शकांनी छत्रपती शिवरायांवर सिनेमे काढून अलगद मुस्लीमद्वेष पेरला. प्रेक्षकांना शिवरायांच्या खर्या सर्वसमावेशक विचारांपासून दूर नेण्यासाठी रचलेले ते कपट होते. कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यामुळे त्या लोकांच्या मनात शिवरायांविषयी काय घाण भरली आहे ती बाहेर आलेली आहे. याच वृत्तीच्या पिलावळीनं बनवलेले सिनेमे आपण जयजयकार करत बघितले होते, हे लक्षात घ्या. ही बांडगुळं आता ज्ञानोबा,मुक्ताबाई आणि तुकोबारायांवर ‘डल्ला’ मारायला सज्ज झाली आहेत.”
“…चार खर्या गोष्टी सांगून, महामानवांचा उदोउदो करायचा… आणि आपल्याला विश्वासात घेत दहा खोट्या गोष्टी खपवायच्या, यात ही जमात माहीर आहे ! तुम्ही ‘चॅलेंज’ करत नाही तोवर हे असंच चालू रहाणार.‘फुले’ सिनेमाबाबतीत मी चुकीचा ठरलो, तर मला आनंदच आहे… पण त्या सिनेमातही खोटे पत्ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रेलरमधल्या एखाद्या प्रसंगावरुन वादंग निर्माण करत पब्लिसिटी करायची ‘लेझीम-ट्रिक’ ताजी आहे ! सावध रहा… आमच्या क्षेत्रातून तुमच्या मेंदूत विष पेरण्यासाठी करोडोंचा ओघ सुरू आहे… त्याला बळी पडू नका. महात्मा फुलेंनी अडाणी बहुजनांना नाडणाऱ्या भटशाहीला ज्या निर्दयपणे दणके दिलेत ते त्याच तीव्रतेनं सिनेमात असतील का? याविषयी मला शंका आहे. ”
‘सीरियल किसर टॅगला कंटाळलो होतो…’; इम्रान हाश्मी म्हणाला, ‘प्रत्येक चित्रपटात जबरदस्तीने…’
“त्यांनी शोधलेली शिवरायांची समाधी… सुरू केलेला पहिला शिवजयंती उत्सव…बहुजन हिंदु मुस्लीमांना एकमेकांत लढवून स्वत: वर्चस्व गाजवणार्या मनुवादी वृत्तीला शह देण्यासाठी महात्मा फुलेंनी महंमद पैगंबरांवर रचलेला सुंदर पोवाडा… हे सगळं त्या सिनेमात असेल का??? ‘छावा’ सिनेमावरून ज्या पद्धतीनं वातावरण नासवलं गेलं… दंगल घडवून आणायचा प्रयत्न झाला…तसं होणार असेल तर माझ्या भावाबहिणींनो… शक्यतो महामानवांवरचे सिनेमे बघूच नका. तुमचं महामानवांवर लैच जबरदस्त प्रेम असेल, तर महामानवांचा खरा इतिहास सांगणारी असंख्य पुस्तकं आहेत, ती वाचा.”
Krrish 4: पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार प्रियांका आणि हृतिकची जोडी? ‘क्रिश ४’ बाबत समोर आले अपडेट!
“कुठल्याही सिनेमाच्या वादात पडून त्याची फुकट पब्लिसिटी करू नका. सिनेमा म्हणजे इतिहास नव्हे. त्यामुळे चर्चा करू नका. ज्यांना ते उगाळत रहायचंय त्यांना उगाळूद्या. आपण ‘जागे’ राहुया… तुकोबाराया म्हणून गेलेत. आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥ – किरण माने.” सध्या किरण माने यांची पोस्ट तुफान व्हायरल होत असून नेटकरी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.