Actress Alka Kubal On Violence Against Women Says Need For Strong Laws
१९९१ साली रिलीज झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेत्री अल्का कुबल प्रसिद्धी झाल्या. अभिनेत्री अल्का कुबलने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गेल्या अनेक वर्षांपासून अल्का कुबल फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहेत. नुकतंच त्यांनी जळगावच्या ‘खान्देश करियर महोत्सव’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान अल्का कुबल यांनी महिलांवर दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या अत्याचारासंबंधित मुद्द्यांवर भाष्य केलं.
Krrish 4: पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार प्रियांका आणि हृतिकची जोडी? ‘क्रिश ४’ बाबत समोर आले अपडेट!
खान्देश करिअर महोत्सवात अभिनेत्री अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या की, “महिलांवरील अत्याचाराच्या घटना ह्या घरातूनच घडत असतात. कोणाचा चुलत भाऊ असतो, तर कोणाचा आत्ये भाऊ असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच एक घटना घडली, त्या घटनेत वडिलांनी आपल्या चार मुलींवर बलात्कार केला. मला असं वाटतं की, एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा. आपल्याकडे कडक शिक्षा व्हायला हवे आहेत. महिलांवर अत्याचार रोखायचं असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे. तिथे लोकांना कायद्याची भिती वाटते.”
‘सीरियल किसर टॅगला कंटाळलो होतो…’; इम्रान हाश्मी म्हणाला, ‘प्रत्येक चित्रपटात जबरदस्तीने…’
“नाही तर चार वर्षे आत आणि नंतर पुन्हा बाहेर आल्यानंतर तेच होणार असेल तर याला काहीच अर्थ नाहीये. या घटना होताना समाजातील लोकांनी या मुलींना वाचवण्यासाठी पुढं येणं गरजेचं आहे, पुण्यात एका मुलीवर हल्ला होत असताना दोन मुलं धावत आली आणि त्यांनी तिला वाचवलं…अशा मुलांचं कौतुक वाटत,” असंही अलका कुबल यांनी म्हटलं. चार मुलींवर बलात्कार करणारा नराधम बापाला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी अल्का कुबल यांनी मुलाखतीतून केली आहे. अलका कुबल यांच्या मुलाखतीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. लहान वयातच मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत. घरात मोठ्यांचे मार्गदर्शन आणि एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे चांगले संस्कार रुजतात, असा आपला अनुभव असल्याचं अलका कुबल यांनी सांगितलं आहे. स्वतःच्या करिअरमध्ये सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि योगदानामुळे आपल्याला यश मिळालं, हे त्यांनी खासपणे नमूद केलं आहे, असंही अलका कुबल म्हणाले.
जया बच्चन ‘या’ आजाराला ग्रस्त; पापाराझींवर चिडण्याचे हेच कारण? श्वेता बच्चनने केला खुलासा…
दरम्यान, राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना अल्का कुबल पुढे म्हणाल्या, “महायुती सरकार महिलांसाठी खूप चांगलं काम करतंय. लाडकी बहीण योजना जिंदाबाद…” अलका कुबल लवकरच ‘वजनदार’या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.