I Was Tired Of The Serial Kisser Tag Emraan Hashmi Interview
आपल्या अभिनयाने आणि सुपरहिट चित्रपट देऊन इमरान हाश्मीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. इमरान हाश्मीची आजही चाहत्यांमध्ये ‘सीरियल किसर’ नावाने ओळख आहे. अनेक चित्रपटांमध्ये ‘सीरियल किसर’ची भूमिका साकारणाऱ्या इमरानने या टॅगबद्दल महत्वपूर्ण विधान केलं आहे. तो म्हणाला की, मला या टॅगमुळे खूप चिड यायची. अभिनेत्याने रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने हा खुलासा केला आहे.
जया बच्चन ‘या’ आजाराला ग्रस्त; पापाराझींवर चिडण्याचे हेच कारण? श्वेता बच्चनने केला खुलासा…
इमरान हाश्मीला ‘सिरियल किसर’ या नावाची फार चिड यायची. इमरान हाश्मीने मान्य केले की, एक काळ असा होता जेव्हा त्याला या टॅगने हाक मारली की, राग यायचा. तो म्हणाला की ‘सिरियल किसर’ हा टॅग मार्केटिंगसाठी प्रत्येकजण वापरतो आणि चित्रपटांमध्ये गरज नसतानाही किसिंगचे सीन्स जोडली जातात. अभिनेता मुलाखती दरम्यान म्हणाला की, “एक काळ असा होता जेव्हा मी थोडासा नाराज व्हायचो. माझ्याकडे लोकांनी गांभिर्यतेने पाहावे, असं मला कायम वाटायचं. २००३ ते २०१२ पर्यंत ‘सिरियल किसर’ हा माझ्यासाठी टॅगच होता. शिवाय तो मार्केटिंगसाठी ही वापरला जायचा. चित्रपटांमध्ये कोणत्याही कारणाशिवाय गोष्टी जोडल्या जात होत्या. मीडियाने माझ्या नावापुढे ‘सिरियल किसर’ टॅग देखील वापरला होता.”
पाकिस्तानात करीना कपूरची हजेरी ? रेव्ह पार्टीतील Viral Video ने सर्वांना केले थक्क!
इमरान हाश्मी पुढे म्हणाला की, “हे सर्व मी जे केले त्यामुळे आहे. मी यासाठी कोणालाही दोष देत नाही. जेव्हा जेव्हा माझे नाव मीडियामध्ये यायचे , त्याआधी मला सिरियल किसर म्हणून टॅग केले जायचे. मी ‘सिरियल किसर’ टॅगच्या इमेजपासून दूर जाण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु प्रेक्षकांनाही मला दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत पाहायचे नव्हते. पण जेव्हा तुम्ही तो टप्पा ओलांडता तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असतं. तुम्हाला एक अभिनेता म्हणून गांभीर्याने घ्यायचं असतं. तुम्ही वेगवेगळे चित्रपट करण्याचा प्रयत्न करता. पण मग लोक म्हणायचे, ‘बरं, या चित्रपटात ते नव्हतं.’ मी काहीतरी नवीन सादर करत आहे. मी एक अभिनेता आहे. वेगवेगळी पात्रे साकारणे हे माझे काम आहे. तुम्हाला तीच गोष्ट पुन्हा का पहायची आहे? यामुळे, मी थोडासा नाराज व्हायचो. पण त्याशिवाय, मी त्यात शांत आहे, मला त्यात कोणतीही अडचण नाही.” इमरान हाश्मीची ‘सिरीयल किसर’ म्हणून इमेजही ‘मर्डर’ फ्रँचायझीमधून तयार झाली होती. दरम्यान, इमरान हाश्मी प्रेक्षकांच्या भेटीला ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटातून येणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.