Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरण मानेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राजगृह’ला दिली भेट; पोस्ट शेअर करत म्हणाला, “सांगितल्या दिवशी दारात गाडी…”

प्रकाश आंबेडकर यांनी अभिनेता किरण मानेला मुंबईच्या 'राजगृह' या निवासस्थानी भेटायला बोलवले होते. ते भेटल्यानंतर त्यांनी अनेक वेळ गप्पाही मारल्या. त्यांनी भेटीदरम्यानचा खास फोटो शेअर करत इन्स्टा पोस्टही शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 22, 2024 | 04:30 PM
किरण मानेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 'राजगृह'ला दिली भेट; पोस्ट शेअर करत म्हणाला, "सांगितल्या दिवशी दारात गाडी…"

किरण मानेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 'राजगृह'ला दिली भेट; पोस्ट शेअर करत म्हणाला, "सांगितल्या दिवशी दारात गाडी…"

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईमधील ‘राजगृह’ हे घर आहे. या घरामध्ये सध्या नेते आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर राहतात. बाबासाहेबांच्या ह्या घराला अभिनेते किरण मानेने भेट दिली. अभिनेत्याने त्यांच्या घराला भेट दिल्या नंतर खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी अभिनेता किरण मानेला मुंबईच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी भेटायला बोलवले होते. ते भेटल्यानंतर त्यांनी अनेक वेळ गप्पाही मारल्या. त्यांनी भेटीदरम्यानचा खास फोटो शेअर करत इन्स्टाग्राम पोस्टही शेअर केली आहे.

‘पुष्पा २’ची वेळ आणखीन २० मिनिटांनी वाढणार; नव्या फुटेजसोबत चित्रपट थिएटरमध्ये कधी रिलीज होणार?

 

नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसोबतचा किस्सा सांगताना अभिनेता किरण मानेनी पोस्टमध्ये लिहिले की,

“ ‘राजगृह’! जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. आपल्याजवळ असलेल्या पन्नास हजार पुस्तकांसाठी हक्काचं घर बांधायला त्यांनी कर्ज काढलं. जे पाहिल्यावर माझी माता रमाई म्हणाली होती, “हे घर नाही. जगातल्या महान विद्वानाचे ग्रंथभांडार आहे.” त्या वास्तूत पाऊल ठेवल्याला आज बरोब्बर एक वर्ष झालं! आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा निरोप आला, “किरणजी, वेळ असेल तेव्हा भेटायला या. गप्पा मारू.” मी सातारला होतो. ‘परवा येतो’ म्हणालो. सांगितल्या दिवशी मला घेऊन जायला सातारला दारात गाडी उभी राहिली!”

“बाबासाहेबांच्या ‘राजगृहा’त आलो आणि अक्षरश: हरवुन गेलो. शहारलो. गलबललो. इथं… इथं बाबासाहेबांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’हे पुस्तक लिहीलं ! एवढंच नाही, तर इथं बसून त्यांनी आपल्या भारत देशाचं संविधान लिहीलं !! मी सतत स्वत:ला भानावर आणत होतो. बाळासाहेब आंबेडकरांबरोबर बसून मनमुराद गप्पा मारल्या. एक तास मी आणि बाळासाहेब दोघंच भरपूर बोलत होतो… फक्त राजकारणच नाही, तर संपूर्ण भवतालाविषयी… मी मध्येच ‘झोन आऊट’ होत होतो… ‘मी बाबासाहेबांच्या कुटूंबातल्या महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर आहे !!!’ पुन:पुन्हा स्वत:ला सावरत होतो…”

“डॉ. बाबासाहेबांचा खरा बौद्धिक आणि सामाजिक वारसा जपणारे बाळासाहेब हे राजगृहाचा लौकीक वाढवत आहेत यात शंका नाही. आजकाल पोकळ झगमगाटापुढे सगळेच आकर्षित होत असताना… या ग्लॅमर दुनियेपासनं लांब सातार्‍यात राहून, अभिनयासोबत वेळात वेळ काढून, परिवर्तनाच्या चळवळीत खारीचा वाटा उचलणार्‍या, माझ्यासारख्या छोट्या कलावंताची या माणसानं दखल घेणं… त्याला सहज गप्पा मारायला बोलवणं हे खूप दिलासादायक होतं. एक वर्षापूर्वीची आठवण आजही काळजाच्या कप्प्यात ताजी आहे ! जय शिवराय… जय भीम.”

Web Title: Actor kiran mane meet balasaheb ambedkar at mumbai rajgruh bunglow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • entertainment
  • Kiran Mane
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
1

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
2

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
3

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
4

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.